Published On : Sat, Mar 7th, 2020

आर्दश ग्रामसेवक पुरस्काराने रविंद्र निशाने सन्मानित

कन्हान : – ग्राम विकास विभाग जि प नागपुर व्दारे पारशिवनी तालुक्यातील बखारी ग्राम पंचायत मध्ये उत्कृष्ट ग्राम विकासात्मक कार्य केल्याबाबत सन २०१४-१५ चा आर्दश ग्रामसेवक पुरस्काराने रविंद्र निशाने यांचा गौरव करून सत्कार करण्यात आला.

महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग जि प नागपुर व्दारे आदर्श ग्रामसेवक सत्कार समारंभ वनामती नागपुर येथे सौ रश्मीताई बर्वे अध्यक्षा जि प नागपुर यां च्या अध्यक्षेत तर मा मनोहर कुंभारे उपा ध्यक्ष, मा संजय यादव मुख्य कार्यकारी अधिकारी, मा. तापेश्वर वैद्य कृषी सभाप ती, मा अकुंश केदार विभागीय उपायुक्त, सौ भारती पाटील सभापती, सौ उज्वला बोढारे सभापती, सौ नेमावती माटे सभा पती, मा कमलकिशोर फुटाणे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नागपुर आदी च्या प्रमुख उपस्थितीत पंचायत विभाग जि प नागपुर अंतर्गत पंचायत समिती पारशिवनी च्या ग्रा प बखारी येथे विका सात्मक कामे केल्याबद्दल रविंद्र निशाने हयांना २०१४-१५ चा आदर्श ग्रामसेवक पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देऊन सत्का र करण्यात आला.


कार्यक्रमाचे प्रास्तावि क प्रकल्प संचालक विवेक ईलमे यांनी केले. सुत्रसंचालन दिनेश मासोदकर यांनी तर आभार प्रदर्शन संजय तांबडे यांनी केले.