Published On : Fri, Nov 27th, 2020

रवीन्द्र कुंभारे यांचा म.न.पा.तर्फे स्नेहील सत्कार

नागपूर : नागपूर महानगरपालिकेत प्रतिनियुक्तीवर असतांना प्रथम उपायुक्त व त्यानंतर अतिरिक्त आयुक्त पदाची धुरा सांभाळणारे श्री. रवीन्द्र कुंभारे, उपजिल्हाधिकारी (नझूल, यू.एल.सी. आणि भूसंपादन) हे प्रदीर्घ सेवेनंतर शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयातून निवृत्त झाले. त्या ‍निमित्ताने मनपाच्या वतीने त्यांचा मनपाचे अतिरिक्त आयुक्त सर्वश्री राम जोशी आणि संजय निपाणे यांनी शाल, मनपाचा दुपटटा व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

श्री. रवीन्द्र कुंभारे यांनी अगोदर मनपा उपायुक्त पदाची धुरा सांभाळली होती नंतर शासनाने त्यांची दुस-यांदा अतिरिक्त आयुक्त पदावर नियुक्ती केल्यानंतर त्या पदाची जबाबदारी देखील त्यांनी यशस्वीपणे पार पाडली होती. महसूल सेवेतील श्री. कुंभारे मनपा मध्ये प्रतिनियुक्तीवर आले होते. श्री. राम जोशी यांनी श्री. कुंभारे यांचे शासकीय सेवेतील योगदानाबददल कृतज्ञता व्यक्त करुन त्यांना जीवनाच्या पुढील वाटचालीकरीता शुभेच्छा दिल्या.

यावेळी उपायुक्त सर्वश्री निर्भय जैन, मिलींद मेश्राम, प्रकाश वराडे, सहाय्यक आयुक्त श्री. महेश धामेचा, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेन्द्र बहिरवार आदी उपस्थित होते.