
चव्हाण यांनी नुकतीच अमित शाहांची दिल्लीत भेट घेतल्याची माहिती आहे. रविंद्र चव्हाण डोंबिवली मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. चव्हाण हे देवेंद्र फडणवीस यांचं अत्यंत जवळचे सहकारी आहेत. राज्याच्या मंत्रिमंडळात ते मंत्री देखील आहेत. गेल्या तीन निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला आहे आणि आता चौथ्यांदाही आमदार म्हणून निवडून आले आहे.
हे पाहता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजप पक्षश्रेष्ठींकडून रविंद्र चव्हाण यांची महाराष्ट्र भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.








