नागपूर : लोकसभा निवडणूकांच्या तोंडावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेचे आयोजन १५ ते १७ मार्चदरम्यान नागपुरात करण्यात आले आहे. संघाच्या अजेंड्यावरील राममंदिर, कलम ३७० हटविणे हे मुद्दे पूर्ण झाल्यानंतर आता देशात लोकसंख्या नियंत्रण कायद्यासंदर्भात या सभेत मंथन होऊ शकते.
या सभेआगोदर संघटनात्मक पातळीवर बैठका होणार आहेत. भारतीय किसान संघ, वनवासी कल्याण आश्रम, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, भारतीय मजदूर संघ, विश्व हिंदू परिषद, भारतीय जनता पक्ष यांच्यासह विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहतील.
समान नागरी कायद्याबाबत संघाचा आग्रह, सामाजिक समरसतेची मोहिम, केरळ-काश्मीरबाबतची संघाची दृष्टी, इत्यादी मुद्द्यांवर या सभेदरम्यान चर्चा होणार आहे. या बैठकीत समाविष्ट होणारे मुद्दे अंतिम झाले असून संघ परिवाराशी जुळलेल्या संस्थांमध्ये समन्वय वाढावा याकरीता मंथन होणार आहे. संघटनविषयक बाबींसह सामाजिकदृष्ट्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली जाणार आहे.
			



    
    




			
			