
नागपूर : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि संघर्षशील लोकनेते अजितदादा अजित पवार यांच्या दुर्दैवी अपघाती निधनाने राज्यात शोककळा पसरली आहे. या दु:खद घटनेवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपल्या वतीने मनापासून श्रद्धांजली अर्पण केली आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक नानासाहेब जाधव यांनी सांगितले की, “अजितदादा यांचा अचानक मृत्यू हा महाराष्ट्राच्या राजकारणासाठी आणि सामाजिक क्षेत्रासाठी मोठी हानी आहे. विकासाच्या दृष्टीने दूरदृष्टी असलेल्या, ठाम आणि रोखठोक नेतृत्वाचा महाराष्ट्राने मोठा दु:खाने निरोप घेतला आहे.”
जाधव यांनी पवार कुटुंबीयांसह सर्व कार्यकर्त्यांना या मोठ्या दुःखातून सावरण्याचा बळ मिळो, अशी मनापासून प्रार्थना केली. तसेच, अपघातात मृत सर्वांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली असून, “ओम शांती” अशी श्रद्धांजली व्यक्त केली.








