नागपूर : इंस्टाग्रामच्या माध्यमातून मैत्री करून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. विनय राजेश इंगळे (वय२२, रा. दत्तात्रय नगर, नागपुर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
माहितीनुसार, पीडित तरुणी ही अल्पवयीन असून २०२३ मध्ये तिची आरोपी विनय सोबत इंस्टाग्रामवर मैत्री झाली. या मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. आरोपी विनयने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत जबदस्ती शाररिक संबंध प्रस्थापित केले. पीडिती तरुणीच्या म्हणण्यानुसार आरोपी सुरुवातीचे काही दिवस तिच्यासोबत चांगला वागला. मात्र नंतर त्याने तिला त्रास देण्यास सुरुवात केली. तो तिचा मानसिक छळ करत तिला मारहाण करायचा. त्याच्यासोबत बोलणे बंद केल्यानंतर विनयने पीडितेला जिवेमारण्याची धमकी दिली. सोबतच तिचे खाजगी फोटो सोशल मीडीयावर व्हायरल करण्याची धमकीही त्याने दिली. आरोपी विनयच्या त्रासाला कंटाळून पीडित मुलीने सक्करदरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.
सक्करदरा पोलिसांनी आरोपी विनय विरोधात २००/२०२४ कलम ३७६ (२) (एन), ३७६ (३) भादंवि सहकलम ६ पोक्सो कायद्याअंर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.