Published On : Thu, Sep 20th, 2018

रामटेक येथे अवैध रेतीट्रकावर कारवाईचा बडगा

Advertisement

रामटेक: नागपूर जिल्ह्यातील परीसरात ज्या ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रेती तस्करी होत आहे ती त्वरेने थांबविण्यासाठी व त्या रेती तस्करीवर अंकुश लाऊन कडक कार्यवाही करावीअसे स्पष्ट पणे जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी अधिकाऱयांना निर्देश दिले.

तुमसर ,भंडारा वरून रामटेक मार्गे रेतीचे ट्रक येणार आहेत अशी गुप्त माहिती मिळाल्यानंतर अवैध रेतीच्या पथकाने महादूला,घोटी टोक येथे ट्रॅकांची तपासणी केली असता चार ट्रॅकाजवळ रॉयल्टी स्लिप न मिळाल्याने भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील रेती घाटातून अवैध वाहतूक करताना 17/9/18रोजी रात्रीं 8 ते 1.

30पर्यत कार्यवाही करतानाMH-49At2164,MH-40-Y9570,AK-8677,AK-6566 वरील वाहना्वर 7,36,600/-दंड वसुल करून रेती जप्त आदेश पारित करण्यात आले. तहसीलदार धर्मेश फुसाटे यांना मिळालेली गुप्त माहिती व त्यांनी पथकाला दिलेल्या सूचनेनुसार अवैध बगौन खनिज वाहतूक रामटेक पथकातील प्रमोद जुमळे,प्रतीक काष्टे, आमिर खान,मुकेश बांगर,जामिर शेख,ठाकरे, अनिल वैध यांनी कार्यवाही केली.यावेळी उपविभागीय अधिकारी जोगेंद्र कटियारे उपस्थित होते.