रामटेक : मौदा,कन्हान,पारशिवनी परिसरातील धान उत्पादक शेतकरी गेल्या काही वर्षांपासून अपुऱ्या पावसाअभावी व चौराई धरण निर्माण होऊन निर्माण झाले ल्या संकटामुळे शेतकरी प्रचंड प्रमाणात अडचणीत सापडलेले आहेत .पूर्वी पाऊस पडला नाही तरी हमखास धरणातून पाणी मिळायचे .परंतु आता या भागातील शेतकरी अनंत अडचणीत सापडला.
परंतु आमदार मल्लिकार्जुन रेड्डी सातत्याने शेतकरी प्रशासन व शासनाच्या संपर्कात असून धान पिकाला यावेळी पाण्याची सर्वात जास्त गरज असून ती गरज पेंच जलाशयातील पाण्यातून पूर्ण केली जावी तसेच धान पीक गर्भपोटी आल्यामुळे सिंचनाकरिता पेंच जलाशयातील १५० घ.मि.मी. पाणी २५ ते ३० दिवस उपलब्ध करून देण्याकरिता आज दिनांक १९ सप्टेंबर, २०१८ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर येथे मा. पालकमंत्री महोदय यांना निवेदन देण्यात आले. यावेळी पेंच संभागातील शेतकरी वर्ग व पानी वापर संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी शेतकऱयांनी धान पिकाला पाणी सोडून धान पिकाला शासनाने जीवदान द्यावे अशी आग्रहाची मागणी केली.यावेळी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांना धान पिकाची सद्यस्थिती आणि शेतकऱ्यांना पाण्याची गरज या मुद्द्यावर सविस्तर चर्चा व शेतकऱ्यांवर तसेच धानपिकावर आलेल्या संकटांवर मात करण्यासाठी पेंच प्रकल्पाचे पाणी त्वरित सोडून शेतकऱ्यांना संकटमुक्त करण्याची मागणी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे ,जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांना केली
ह्यावेळी पेंच पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता जितेंद्र तुरखेडे,पाणी वाटप संस्थेचे पदाधिकारी व शेतकरी बांधव उपस्थित होते.निवेदन दिल्यावर झालेल्या चर्चेदरम्यान पालकमंत्री बावनकुळे यांनी शासन शेतकरी हिताचे निर्णय त्वरीत घेणार असल्याचे सांगितले.