Published On : Thu, Apr 9th, 2020

रामटेक मधे पोलिसांचा रुट मार्च

Advertisement

रामटेक: जगभरात कोरोना ने थैमान माजविले आहे. संपूर्ण देशांत लॉक डाऊन झाले आहे. कोरोना च्या पाश्र्वभूमीवर रामटेक येथे उपविभागिय पुलिस अधिकारी नयन आलूरकर , पुलिस निरीक्षक दिलिप ठाकुर यांचे नेतृत्वात रामटेक पोलीस प्रशासन, होमगार्ड,सुरक्षा रक्षक ,पोलिस मित्र यांच्यातर्फे आज रामटेक येथे फ्लॅग मार्च काढून गावातील जनतेला संदेश देण्यात आला की आपण घरी रहा सुरक्षित रहा व घरी राहून प्रशासनाला कोरोणाला हरवण्यास मदत करा.

असा संदेश देउन नागरिकांना घरा मधे राहण्यासाठी आव्हान केले . तरीही काही नागरिक घरात बाहेर विनाकारण फिरत आहेत. म्हणून पोलीस कर्मचारी जनतेला वारंवार आव्हान करत आहे. यावेळी रामटेक करांनी आपापल्या घरा समोर व बाल्कनीत उभे राहून पोलीस पथकानं साठी टाळी वाजवून पुष्प वर्षाव करण्यात आला.

तुम्ही घराबाहेर पडू नका तुमच्या सुरक्षिते साठी आम्ही आहोत.. असे उपविभागिय पुलिस अधिकारी नयन आलुरकर तसेच पुलिस निरीक्षक दिलिप ठाकुर यांनी आव्हान केले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तायत्र शेंडगे, महिला पोलिस सहाय्यक निरीक्षक निशा भुते, महिला पोलिस उपनिरीक्षक मिना बारंगे, पोलीस उप निरीक्षक श्रीकांत हत्तीमारे व प्रमोद कोलेकर , पुलिस दल सतत्त तैनात राहुन मोलाची भूमिका बजावीत आहे.रामटेक पोलीस प्रशासन सोबत संकट च्या समयी होमगार्ड,सुरक्षा रक्षक , वाइल्ड चॅलेंजर ग्रुप ,पोलिस मित्र व रामराज्य ग्रुप हे देखिल मोठ्या उत्साहात फ्लॅग मार्च मधे

गावातील जनतेला संदेश देताना सहभागी झाले होते.