Published On : Wed, Jan 29th, 2020

रामटेक पंचायत समितीस माजी मंत्री यांची भेट

ग्रामीण भागातील विकासासाठी कटिबद्ध राहा: मुळक


रामटेक– पंचायत समितीच्या रामटेक रामटेक येथील कार्यालयात माजी मंत्री राजेंद्र मुळक यांनी नुकतीच भेट दिली. आणि नवनिर्वाचित पंचायत समितीच्या सभापती ,उपसभापती व सदस्यांचे अभिनंदन केले.सभापती कला ठाकरे यांनी माजी मंत्री राजेंद्र मुळक यांचा शाल ,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व उपस्थितांचे स्वागत केले.

निवडून आलेल्या सर्व सदस्यांनी ग्रामीण भागातील विकासासाठी कटीबद्द राहून शासनाच्या योजनांची माहिती सामान्य माणसाच्या दारापर्यंत गेल्या पाहिजे आणि त्याचा उपयोग जनकल्यानासाठी व्हायला पाहिजे असे विचार व्यक्त केले.

यावेळी सभापती कला ठाकरे यांनी यावेळी माजी आमदार आनंदराव देशमुख, गज्जू यादव, पंचायत समिती सभापती कलाताई ठाकरे, जी प सदस्य कैलास राऊत,योगेश देशमुख, उपसभापती रविन्द्र कुंभरे ,प स सदस्य भूषण होलगिरे, संजय नेवारे, भूनेश्र्वरी कुंभलकर , पिंकी रहाटे, रिना काठौटे , चंद्रकांत कोडवते, मंगला सरोदे , पी. टी रघुवंशी , प्रशांत कामडी, इस्माईल शेख तालुकाध्यक्ष पिंटू नंदनवार , मयंक देशमुख ,मनोज नौकरकर , रमरतन गजभिये , अब्राख सिद्दीकी, फरान शेख , मोहिन पठाण , स्नेहदीप वाघमारे प्रामुख्याने उपस्थित होते.