Published On : Tue, Jun 18th, 2019

राम शिंदे यांनी घेतला पणन विभागाच्या कामांचा आढावा

Advertisement

मुंबई : नाफेडच्यावतीने खरेदी करण्यात आलेल्या कडधान्य व तेलबिया यांची हमीभावाने खरेदी केलयानंतर शेतक-यांची चुकारे देण्याबाबत तसेच पणन संबंधित कार्यालयांच्या कामांचा आढावा पणन व वस्त्रोद्योग मंत्री राम शिंदे यांनी घेतला.

आज मंत्रालयात पणन विभागांतर्गत येणाऱ्या महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ, महाराष्ट्र राज्य कपूस उत्पादक पणन महासंघ, वखार महासंघ, पणन संचालक आणि कृषी पणनमंडळ या कार्यालयांच्या कामांचा आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंत्री शिंदे बोलत होते. या बैठकीस कॉटन फेडरेशनचे व्यवस्थापकीय संचालक नवीन सोना, मार्केटींग फेडरेशनचे व्यवस्थापकिय संचालक डॉ. योगेश म्हस्के, वखार महामंडळाचे चेअरमन आणि व्यवस्थापकिय संचालक सचिंद्र प्रतापसिंग आदीसह संबंधित विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

Gold Rate
27 June 2025
Gold 24 KT 96,400 /-
Gold 22 KT 89,700 /-
Silver/Kg 1,07,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

श्री. शिंदे म्हणाले, सहाकरी पणन महासंघ, कॉटन फेडरेशन, वखार महासंघ यातील पदे भरताना हमीभावाने खरेदी किती होते यावर अवलंबून असल्याने या तीन संघांनी एकंदरीत व्यवसायाचा नफा पाहून कमीत कमी परंतु गरजेपुरते पदे भरण्याची दक्षता घ्यावी यासाठी उच्चस्तरीय समिती अथवा मंत्रिमंडळाची मान्यता आवश्यक असल्यास घ्यावी, असेही श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले. तिन्ही महासंघाचे आऊट लेट, बाजारसमित्या, त्यांच्या निवडणुका, खाजगी बाजार त्यांची उलाढाल अशा विविध विषयांच्या कामांचा आढावा श्री. शिंदे यांनी यावेळी घेतला.

Advertisement
Advertisement