| | Contact: 8407908145 |
    Published On : Tue, Jun 18th, 2019

    #MahaBudget2019 : महा अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे

    अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे:


    महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान अभियानातंर्गत आतापर्यत रु. २ हजार २०० कोटी किमतीचे ४० प्रकल्प


    रु.१७ हजार ८४३ कोटी किमतीच्या शिवडी न्हावा शेवा मुंबई पारबंदर प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर, प्रकल्प २०२२ पर्यत पुर्ण करण्याचे नियोजन


    रु. ११ हजार ३३२ कोटी ८२ लक्ष‍ किमतीच्या वांद्रे-वर्सोवा सागरी मार्गाचे काम प्रगतीपथावर, काम ५ वर्षात पुर्ण करण्याचे नियोजन


    अर्थसंकल्प फुटला आहे या विरोधकांच्या आरोपावर मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण

    ट्विटरवर आलेले सर्व ट्विट हे भाषणाआधी आलेले नाहीत. त्यात १५ मिनिटांचं अंतर आहे. केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पावेळी पीएमच्या ट्विटमध्ये फक्त २ ते ३ मिनिटांचं अंतर असतं. त्याची लाईव्ह बातमीही सुरु असते. डिजिटल मीडियादेखील अर्थसंकल्पाची दखल घेत असतं. विरोधी पक्षांनी ही माध्यमं समजून घ्यावीत. आमच्यावर टीका करण्यासाठी विरोधक ट्विटरचा वापर करतात आम्ही सकारात्मक वापर करत आहेत यामुळे त्यांनी आक्षेप घेऊ नये. विरोधकांनी पुन्हा सभागृहात यावं.


    मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाचे अंतर कमी करण्याच्या प्रकल्पावर रु. ६ हजार ६९५ कोटी इतका खर्च अपेक्षित, काम प्रगतिपथावर

     


    नागपूर- मुंबई समृध्दी महामार्गाचे काम जलदगतीने सुरु, बांधकामाचे १६ पॅकेजेस मध्ये नियोजन, पैकी १४ पॅकेजेस चे कार्यारंभ आदेश


    मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत ८ हजार ८१९ किमी लांबीची कामे पुर्ण, उर्वरित २० हजार २५७ किमी लांबीची कामे प्रगतीपथावर


    रस्ते विकास योजनेतंर्गत सन २००१-२०२१ मध्ये एकूण ३ लाख ३६ हजार ९९४ किमी लांबीच्या रस्त्यांचे उद्दिष्ट, आतापर्यत २ लाख ९९ हजार ४४६ किमी पेक्षा जास्त लांबीचे रस्ते विकसित

     


    महाराष्ट्र सदनात लोकमान्य टिळकांचा पुतळा उभारण्यात येणार

    महाराष्ट्र सदनात लोकमान्य टिळकांचा पुतळा उभारण्यात येणार, त्यासाठी निधीची तरतूद – सुधीर मुनगंटीवार


    सहकारी संस्थाच्या नाविण्यपुर्ण प्रकल्पांशी संबंधित अटल अर्थसहाय्य योजनेकरीता रु. ५०० कोटी निधी उपलब्ध


    भावांतर योजनेसाठी चालू आर्थिक वर्षात आणखी रु. ३९० कोटी निधी उपलब्ध करणार


    छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत ५०.२७ लाख खातेदारांसाठी रु. २४ हजार १०२ कोटी मंजूर


    दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे स्मारक मुंबईत उभारले जाणार – सुधीर मुनगंटीवार


    रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी ६०६ कोटींच्या खर्चास मान्यता – सुधीर मुनगंटीवार


    नीलक्रांती अभियानातंर्गत ससून गोदी बंदराचे आधुनिकीकरण, रायगड जिल्हयातील करंजा येथे मासेमारी बंदराची निर्मिती, वेंगुर्ल्यातील वाघेश्वर येथे मत्स्यबीज उत्पादन केंद्राची निर्मिती, ९० टक्के अनुदानावर शेतकरी गटांना मासळी विक्रिसाठी फिरते वाहन या योजना राबविणार


    दहावी आणि बारावीत नापास विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा तसंच आपल्या पायावर उभे राहावेत यासाठी रोजगार कौशल्य प्रशिक्षण देणयाचा प्रस्ताव – सुधीर मुनगंटीवार


    शिर्डीतील भाविकांसाठी सुरक्षेसाठी पथदर्शी प्रकल्प राबवण्यात येणार – सुधीर मुनगंटीवार


    राज्यात ८० तालुक्यांमध्ये मुख्यमंत्री पशु स्वास्थ्य योजनेतंर्गत फिरते पशु वैद्यकीय चिकित्सालय स्थापन करणार


    दुध उत्पादक शेतक-यांना अनुदान, दुधसंघ व खाजगी दुग्ध प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन म्हणून रु. ४७४ कोटी ५२ लक्ष इतका निधी वितरीत


    महिला बचट गटांची जनजागृती करण्यासाठी नवीन योजना राबवण्याचा विचार – सुधीर मुनगंटीवार


    अल्पसंख्यांक समाजातील महिला आणि तरुणांना रोजगार मिळावा यासाठी १०० कोटींची तरतूद – सुधीर मुनगंटीवार


    २ हजार २२० कोटी रु. किमतीचा महाराष्ट्र राज्य कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्ततन प्रकल्प राबविणार


    सामुहिक गटशेतीसाठी चालू आर्थिक वर्षात रु. १०० कोटी इतका नियतव्यय राखीव


    महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ हे सार्वजनिक बस वाहतुकीचा कणा


    मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजनेतंर्गत ४६ प्रकल्पांना मान्यता


    कृषी विद्यापीठे व नवीन कृषी महाविद्यालये यासाठी रु.२०० कोटी नियतव्यय राखीव

    कृषी विद्यापीठे व नवीन कृषी महाविद्यालये यासाठी रु.२०० कोटी नियतव्यय राखीव, मूल जि. चंद्रपूर, हळगाव जि. अहमदनगर येथे शासकीय कृषी महाविद्यालये तर यवतमाळ आणि पेठ जि. सांगली येथे अन्न तंत्रज्ञान महाविद्यालये स्थापन होणार


    सुधीर मुनगंटीवार अर्थसंकल्प मांडत असताना विरोधकांचा जोरदार गोंधळ.  विधानसभा अध्यक्षांनी विरोधकांना खडसावलं असून आक्षेप होता तर आधीच घ्यायला हवा होता असं बजावलं.


    कृषी विद्यापीठे व नवीन कृषी महाविद्यालये यासाठी रु.२०० कोटी नियतव्यय राखीव


    सुधीर मुनगंटीवार अर्थसंकल्प मांडत असताना विरोधकांचा जोरदार गोंधळ.


    २ हजार ६१ महसूल मंडळांमध्ये स्वयंचलित हवामान केंद्राची यशस्वी उभारणी


    सुक्ष्म सिंचनासाठी रु. ३५० कोटी इतका नियतव्यय राखीव


    महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत राज्य अभिसरण आराखडयाची अंमलबजावणी


    मागेल त्याला शेततळे या योजनेतंर्गत २५ हजार शेततळी पुर्ण करण्याचे उद्दीष्ट


    मृद व जलसंधारण विभागाकरीता रु. ३ हजार १८२ कोटी २८ लक्ष ७४ हजार तरतूद


    महात्मा गांधींच्या १५० व्या जयंतीनिमित्त कार्यक्रमांसाठी १५० कोटींची तरतूद – सुधीर मुनगंटीवार


    लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यासाठी १०० कोटी निधी राखून ठेवण्यात येत आहे


    सायन-पनवेल महामार्गावरील पुलासाठी ७७५ कोटींची तरतूद – सुधीर मुनगंटीवार


    जलयुक्त शिवार अभियानातंर्गत ६ लक्ष २ हजार मृद व जलसंधारणाची कामे पुर्ण


    आर्थिक वर्षासाठी जलसंपदा विभागाकरीता रु. १२ हजार ५९७ कोटी १३ लक्ष ८९ हजार तरतूद


    ८० टक्के दिव्यांग असणाऱ्यांना घर बांधून देणार – सुधीर मुनगंटीवार


    तुम्हाला विसर्जित करणं हे गांधींजींचं स्वप्नच होतं,- सुधीर मुनगंटीवार

    तुम्हाला विसर्जित करणं हे गांधींजींचं स्वप्नच होतं, सुधीर मुनगंटीवारांचा गोंधळ घालणाऱ्या विरोधकांना टोला


    खुल्या कालव्यांऐवजी नलिका वितरण प्रणालीद्वारे सिंचनाचे धोरण, त्यामुळे भुसंपादनाच्या खर्चात बचत


    बळीराजा जलसंजिवनी योजनेकरीता सन २०१९-२० या आर्थिक वर्षाकरीता रु. १ हजार ५३१ कोटी एवढी भरीव तरतूद


    सन २०१९ च्या मान्सून कालावधीत आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे कृत्रिम पाऊस पाडण्याच्या प्रयोगास मान्यता


    मागील साडेचार वर्षात १४० सिंचन प्रकल्प पुर्ण


    राज्यातील २६ अपुर्ण सिंचन प्रकल्पांचा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश


    गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्प डिसेंबर २०२१ पर्यत पुर्ण करण्याचे नियोजन


    प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेसाठी सन २०१९-२० या वर्षात रु. २ हजार ७२०‍ कोटी एवढी भरीव तरतूद


    नैसर्गिक आपत्तीच्या निवारणासाठी ६४१० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यानंतरही आवश्यकता भासल्यास अतिरिक्त निधी उपलब्ध करणार


    गोवर्धनासाठी आतापर्यंत १७ कोटींचा निधी खर्च करण्यात आला


    कांदा उत्पादक शेतकर्यांना ११४ कोटींचा निधी देण्यात आला



    1 लाख 67 हजार शेततळ्यांची कामं पुर्ण करण्यात आली


    काजू उत्पादन प्रकल्पांसाठी १०० कोटींची तरतूद


    राज्यात १६३५ चारा छावण्या सुरू करण्यात आल्या असून त्यासाठी पशुधनाच्या अनुदानात वाढ


    शेतकऱ्यांना थेट बाजारपेठ मिळावी जागतिक बँकेच्या सहाय्याने प्रकल्प राबवण्यात येईल


    शेतीशी निगडीत कर्जाच्या वसूलीस स्थगिती


    चार कृषी विद्यापिठांसाठी ६०० कोटींची तरतूद करण्यात येत आहे


    गोपीनाथ मुंडे अपघात वीमा योजनेत सुधारणा

    गोपीनाथ मुंडे अपघात वीमा योजनेत सुधारणा करण्यात येत आहे. योजनेच्या निकषानुसार २ लाखांपर्यंत नुकसान भरपाई देण्यात येत होती. नवीन सुधारणेनुसार संपूर्ण कुटुंबाला समाविष्ट करण्याचा प्रस्ताव आहे. साडे पाच कोटी जनतेला वीमा छत्र उपलब्ध होईल. २१० कोटी राखून ठेवण्यात येत आहेत – सुधीर मुनगंटीवार


    १८६९६ गावामध्ये जलयुक्त शिवारांची कामे पूर्ण


    सिंचन प्रकल्पासाठी नाबार्डकडून कर्ज मिळण्यासाठी करार


    दुष्काळी भागीतल सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यावर सर्वाधिक भर


    चार छावण्यांच्या अनुदानात वाढ करण्यात आली.


    दुष्काळ परिस्थिती निवारण्यासाठी केंद्राकडून ४५६३ कोटींची मदत


    राज्यातील २८५२४ गावांमध्ये दुष्काळी परिस्थिती


    अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार मांडत आहेत अर्थसंकल्प विधानसभेत अर्थसंकल्प मांडण्यास सुरुवात

    Trending In Nagpur
    Stay Updated : Download Our App
    Mo. 8407908145