Published On : Sat, Aug 26th, 2017

हायकोर्टाची 2 दिवसांत 5 वेळा सुनावणी; लष्कर तैनातीचे आदेश, हरियाणा सरकार तरीही गाफील


श्रीनगर/नवी दिल्ली: गुरमित राम रहिमला अत्याचार प्रकरणात दोषी ठरवण्यात आल्यानंतर समर्थकांनी प्रचंड उत्पात माजवला. त्यात १८ जणांना प्राण गमवावे लागले तर २०० जखमी झाले. हरियाणाच्या पंचकुलामधून सुरू झालेल्या हिंसाचाराचे लोण तासाभरात पंजाब, चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश व राजस्थानापर्यंत जाऊन पोहोचले. सायंकाळी सैन्याने पंचकुला आणि सिरसामध्ये लष्करी पथसंचलन केले.

डेरा समर्थक बुधवारपासूनच पंचकुलामध्ये मुक्कामी आले होते. पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाने गुरूवारी तीन वेळा आणि शुक्रवारी दोन वेळा सुरक्षेवरून सुनावणी घेतली. खरे तर कोर्टाने गुरूवारीच सरकारला फटकारले होते. एका व्यक्तीचा जरी मृत्यू झाला तर त्यास पोलिस-प्रशासन जबाबदार राहील, असे मानले जाईल, असे कोर्टाने बजावले होते. त्यानंतर प्रशासनाने उच्च न्यायालयाला शुक्रवारपर्यंत डेरा समर्थकांना शहरातून बाहेर काढले जाईल, असे आश्वासन दिले आणि पण त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली नाही.

शुक्रवारी सुमारे तीन वाजता निर्णय जाहीर झाल्यानंतर डेरा समर्थकांनी पंचकुलामध्ये शेकडो गाड्यांना पेटवून दिले. पत्रकार आणि अन्य लोकांवर हल्ला केला. लष्कर आणि पोलिसांनी गर्दीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला तेव्हा डेरा समर्थक प्रचंड तोडफोड आणि जाळपोळ करत चंदिगडच्या दिशेने गेले. हिंसाचाराचे लोण पंजाबपर्यंत पोहोचले. दिल्लीत १२ बसेसची जाळपोळ केली. रात्री हरियाणा पोलिसांनी १०० डेरा समर्थकांना ताब्यात घेतले.

Advertisement

खट्टर सरकार तीन वर्षांत ३ मोठ्या घटनांत अपयशी
१. जाट आंदोलन : ३० हून अधिक मृत्यू, २५ हजार कोटींचे नुकसान
जाट आंदोलनचा मुकाबला करण्यात सरकार अयशस्वी ठरले होते. रोहतकमध्ये आंदोलक हिंसक बनले होते आणि सरकारच्या ते गावीही नव्हते. या हिंसाचारात ८ जिल्हे होरपळून निघाले होते. ३० हून अधिक मृत्यू झाले होते. आंदोलकांनी कोट्यवधी सरकारी आणि खासगी संपत्तीला पेटवून दिले होते. महिलांवर अत्याचार केल्याच्याही बातम्या होत्या. सुमारे २५ हजार कोटींची हानी झाली होती.

Advertisement

२.रामपाल यांची अटक: आश्रमातून बाहेर काढण्यासाठी २ आठवडे
स्वयंघोषित संत रामपाल यांच्या अटकेवेळी देखील हरियाणातील सरकारला कडक खमकेपणा दाखवू शकले नव्हते. जवळपास दोन आठवड्यांपर्यंत त्यांचे समर्थक आणि पोलिसांत तणाव होता. नंतर मात्र सतलोक आश्रमातून रामपालला अटक झाली. सहा जणांचा मृत्यू झाला होता. त्यांच्यावर कोर्टाच्या अवमाननेचा खटला सुरू होता.

हरियाणातील ३० विधानसभा जागांवर राम रहीम यांचे ३५ लाख समर्थक असल्याने सरकारने कारवाई टाळली

– पंजाब आणि हरियाणात निवडणुकीपूर्वी प्रत्येक राजकीय पक्षाच्या नेत्यांचे येथे येणे-जाणे वाढते. राज्यात राम रहिमचे ५० लाखाहून जास्त समर्थक आहेत. त्यांची दलित समुदायावर पकड आहे. राम रहिम ज्या पक्षाकडे अंगुलीनिर्देश करतात, त्यास त्यांचे समर्थक कौल देतात.

– राम रहिम यांचा हरियाणातील नऊ जिल्ह्यांतील सुमारे ३० हून अधिक मतदारसंघात प्रभाव आहे. यावेळी डेराने भाजपला समर्थन दिले होते. त्यामुळे भाजपला १२ हून अधिक ठिकाणी विजय मिळाला होता.

– तत्पूर्वी मात्र भाजपला त्यापैकी केवळ भिवानी मतदारसंघातून विजय मिळाला होता. डेराने काँग्रेसच्या विजयात महत्त्वाची भूमिका निभावली होती.

मंत्र्यांनी तिजोरी उघडली
– हरियाणाचे शिक्षण मंत्री राम विलास शर्मा यांनी राम रहिम यांच्या वाढदिवशी ५१ लाख रुपयांची देणगी जाहीर केली.

– क्रीडा मंत्री अनिल वीज यांनी ५० लाख रुपये ,मनीष ग्रोवर यांनी ११ लाख , केंद्रीय क्रीडा मंत्री विजय गोयल यांनीही ३० लाख रुपयांची मदत दिली होती.

राम रहीमच्या समोर सरकारचे लोटांगण
– हायकोर्टाकडून पोलिसांना पंचकुलातील सव्वा लाख समर्थक पांगवण्याचे आदेश.
– डीजीपी म्हणाले- सकाळपर्यंत त्यांना शहराबाहेर काढू, पण आवाहनाची आैपचारिकता
– कलम १४४ लागू झाल्यानंतरही पंचकुला व सिरसामध्ये जमले लाखो समर्थक.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement