Published On : Mon, May 20th, 2019

राखुंडे नगरातील वीज पुरवठा मध्यरात्री सुरळीत

“पॉवर ऑन व्हील”चा वापर

नागपूर शहराच्या एका कोपऱ्यात असणाऱ्या राखुंडे नगरातील वीज पुरवठा महावितरणकडून सोमवारी पहाटे अडीच वाजता सुरळीत करण्यात आला. महावितरणकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार राखुंडे नगरातील वीज ग्राहकांना वीज पुरवठा करणाऱ्या रोहित्रात रात्री ११. १५ च्या सुमारास तांत्रिक बिघाड झाल्याने येथील ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. राखुंडे नगरातील वीज ग्राहकांना ३३ कि. व्हो. खरबी उपकेंद्रातून वीज पुरवठा बंद होतो. खरबी वीज उपकेंद्रातील रोहित्र नादुरुस्त झाल्याने सुमारे ४०० वीज ग्राहकांचा वीज पुरवठा बंद झाला होता.

Advertisement

महावितरणच्या हुडकेश्वर उपविभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता मते यांना येथील वीज ग्राहकांनी वीज पुरवठा खंडित झाल्याची माहिती दिली. रोहित्र बिघडल्याने रात्री वीज पुरवठा सुरळीत करणे जवळपास अशक्य होते. पण महावितरणच्या काँग्रेस नगर विभागात अकस्मात वेळी वीज पुरवठा सुरु करण्यासाठी “पॉवर ऑन व्हील” ची सोय आहे. यात एका लहान ट्रकवर २२० केव्हीए क्षमतेचे रोहित्र आहे. अकस्मात वेळी खंडित वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी याचा वापर केल्या जातो.

मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास “पॉवर ऑन व्हील”वरील रोहित्र राखुंडे नगरात आणून येथील वीज पुरवठा सुमारे २. १५ वाजता सुरु करण्यात आला. महावितरणच्या जनमित्र आणि कर्मचाऱ्यांनी धावपळ करून मध्यरात्री वीज पुरवठा सुरळीत केल्याबद्दल वीज ग्राहकांनी धन्यवाद दिले आहेत.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement