Published On : Fri, May 4th, 2018

केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री (स्व.प्र.) व केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री कर्नल राज्यवर्धन राठोड यांचा नागपूर दौरा


नागपूर: केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) व केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री कर्नल राज्यवर्धन राठोड हे दिनांक 6 मे व 7 मे रोजी नागपुरच्या दौ-यावर येत आहेत.

6 मे रविवार रोजी सायंकाळी 4.50 ला त्यांचे नागपूर विमानतळावर आगमन होणार असून मानकापूर विभागीय क्रीडा संकूलात आयोजित खासदार क्रीडा महोत्सवाच्या उद्‌घाटन सोहळ्यास 6 ते 7.30 वाजे दरम्यान ते उपस्थित राहणार आहेत.

मंत्री महोदय रात्री नागपूरला मुक्कामी राहून 7 मे, सोमवार रोजी सकाळी 8.20 ला दिल्लीला विमानाने रवाना होतील.