Published On : Thu, Oct 29th, 2020

राज्यात कोविड संदर्भात, 2 लाख 89हजार गुन्हे, 35 कोटी 18 लाख रुपयांची दंड आकारणी, 42 हजार व्यक्तींना अटक – गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई/नागपूर: लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविड संदर्भात कलम 188 नुसार 2 लाख 89 हजार गुन्हे,तसेच 1347 वाहनांवर अवैध वाहतूकीचे गुन्हे दाखल झाले तर 35 कोटी 18 लाख रुपयांची दंड आकारणी करण्यात आली. अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

राज्यात दि.22 मार्च ते 28 आँक्टोंबर पर्यंत कलम 188 नुसार 2,89,247 गुन्हे नोंद झाले असून 42,069 व्यक्तींना अटक करण्यात आली.96 हजार वाहने जप्त केली. यातील विविध गुन्ह्यांसाठी 35 कोटी 18 लाख 57 हजार 908 रु. दंड आकारण्यात आला.

Gold Rate
18 Aug 2025
Gold 24 KT ₹ 1,00,100 /-
Gold 22 KT ₹ 93,100 /-
Silver/Kg ₹ 1,15,400/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

कडक कारवाई:
कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत. परंतु काही दुष्ट प्रवृत्ती त्यांच्यावर हल्ला करीत आहेत. अशा हल्लेखोरांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस विभागाला देण्यात आलेले आहेत.
या दरम्यान पोलिसांवर हल्ला होण्याच्या 381 घटना घडल्या. त्यात 904 व्यक्तींना, ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे.

100 नंबर- 1 लाख 14 हजार फोन:
पोलीस विभागाचा 100 नंबर हा सर्व जिल्ह्यात 24 तास कार्यरत असतो. लॉकडाऊनच्या काळात या फोनवर 1,14,356 फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली. या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या 1347 वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले. तर 96,696 वाहने जप्त करण्यात आली.

कोरोना कक्ष:
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात राज्यातील 26,395 पोलीस व अधिकारी कोरोना ग्रस्त झाले होते त्यापैकी 24,595 कोरोना मुक्त झाले आहेत.
दुर्देवाने 255 पोलीस व 28 अधिकारी अशा एकूण 283 पोलिस कर्मचारी/अधिकारी बांधवांचा मृत्यू झाला. पोलिसांना जर कोरोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आली तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत.

नागरिकांचा सहभाग:
कोरोना विरुद्धच्या लढाईत राज्यातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग हा अपेक्षित आहे. तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची मोठी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. सर्वांनी नियम पाळून सहकार्य करावे, असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे.

Advertisement
Advertisement