Published On : Mon, Feb 15th, 2021

राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांचे आगमन

– रामटेक मनसे अध्यक्ष शेखर दुंडे यांनी केले स्वागत

रामटेक – नागपूर नगरीमध्ये राज ठाकरे यांचे सुपुत्र व मनसे नेते अमित ठाकरे यांचे आगमन झाले.
रामटेक विधानसभा क्षेत्राद्वारे अमित ठाकरे यांचे पुष्पगुच्छ देऊन मनसे चे रामटेक तालुका अध्यक्ष शेखर दुन्डे यांनी स्वागत केले.

तसेच यावेळी मनसेचे जिल्हा सचिव मनोज गुप्ता, मनसेचे रामटेक तालुका अध्यक्ष शेखर दुन्डे , गुप्ता ,रामटेक तालुका उपाध्यक्ष मनोज पालीवार, राजेश देवतळे व इतर मनसे पदाधिकारी व कार्यकर्ता मोठ्या संख्येने रविभवण येथे उपस्थित होते.