Published On : Sat, May 11th, 2019

रेल्वे स्थानकावर उष्माघाताचा बळी?

नागपुर: नागपूर रेल्वे स्थानकावर बेशुध्दावस्थेत आढळलेल्या ७० वर्षीय वृध्देचा मृत्यू झाला. रेल्वे डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. ही घटना आज शुक्रवारी सकाळी फलाट क्रमांक २/३ वर घडली. उष्माघाताने त्यांचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. अद्यात मृत वृध्देची ओळख पटली नाही.

सध्या सुर्य आग ओकू लागला आहे. बेघर आणि निराधारांचे जगणे असह्य होत आहे. अशातच नागपूर रेल्वे स्थानकाच्या फलाटावर एक वृध्द महिला बेशुध्दावस्थेत आढळली. माहिती मिळताच रेल्वे डॉक्टर आणि लोहमार्ग पोलिस घटनास्थळी पोहोचले. डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. यानंतर लोहमार्ग पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून शवविच्छेदनासाठी मेयो रुग्णालयात पाठविले. मृतकाची रंग सावळा, चेहरा गोल, उंची ५ फूट आणि शरीर बांधा सळपातळ आहे. अंगात फि कंट पिवळ्या रंगाचा ब्लाऊज आणि निळ्या रंगाची साळी घातली आहे. त्यांच्या उजव्या हातावर आरती, सावत्री गोंदविले आहे. या प्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी नोंद केली असून पुढील तपास हेड कॉन्स्टेबल परमानंद वासणिक करीत आहेत.