Published On : Fri, Apr 26th, 2019

रेल्वेत बाटलीबंद पाण्याचा गोरखधंदा

रेल नीरच्या बाटलीत नळाचे पाणी. आरपीएफने केला भंडाफोड. लोखंडी पुलाजवळ एका खड्ड्यात ड्रमभर पाण्याच्या बाटल्या

रेल नीरच्या बाटलीत नळाचे पाणी भरून रेल्वेत त्याची सर्रास विक्री करणाºया गोरखधंद्याचा आरपीएफने भंडाफोड केला. लोखंडी पुलाच्या काही अंतरावरच लिंक केबिन जवळ एक मोठा ड्रम झाडाच्या सावलीत जमिनीत गाडला होता. त्यात रेल नीरच्या १५० पाण्याच्या बाटल्या आढळून आल्या. शेजारीच ५० रिकाम्या बाटल्या आणि बाटल्यांचे १०० झाकनही पडले होते. आरपीएफने संपूर्ण मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई आज गुरूवारी सकाळच्या सुमारास करण्यात आली. या घटनेमुळे बाटलीबंद पाण्याचा गोरखधंदा सर्रास सुरू असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले.

Advertisement

बाटली बंद पाण्याला प्रवाशांची पसंती आहे. तापमान वाढताच पाण्याची प्रचंड मागणी वाढली. या संधीचे सोन करीत अवैध विक्रेत्यांनी वेगळीच शक्कल लढविली. नागपूर रेल्वे स्थानकाला अवैध वेंडर मुक्त केल्यानंतर त्यांनी आपला मोर्चा आऊटरकडे वळविला. लोखंडी पुल ते एनएमसी पुला दरम्यान लिंक केबिन जवळ असलेल्या झाडाच्या सावलीत एक मोठा ड्रम जमिनीत गाडला. कोणाला दिसणार नाही, अशा पध्दतीने ड्रमला ठेवले. त्यात रेल नीरच्या बाटलीत नळाचे पाणी भरून तसेच बाटल सिलबंद करून ड्रममध्ये ठेवल्या होत्या. बाटल्या थंड करण्यासाठी बर्फही होते. आऊटरचा भाग असल्याने येथून गाडीची गती फारच कमी होते. बरेचदा सिग्नल न मिळाल्याने गाड्या थांबूनही असतात. याच वेळात या बाटलीबंद पाण्याची सर्रास विक्री केली जाते. घटनेच्या वेळी प्लास्टिकच्या ड्रममध्ये १५० रेल नीरच्या बाटल्या मिळाल्या. याशिवाय इतर कंपनीचे लेबल असलेल्या ५० बाटल्याही आढळल्या. एकूनच या बाटल्यांच्या स्थितीवरून त्यांचा पुर्नवार केला जात असल्याचे लक्षात येते. मात्र, सिल असल्याने सहसा प्रवासी अधिक खोलात जाण्याचा प्रयत्न करीत नाही. त्यामुळे हा गोरखधंदा चांगलाच सुरू होता. विशेष म्हणजे ड्रम जवळच एक नळही आहे. त्याच नळातून रिकाम्या बाटल्यात पाणी भरून त्याची विक्री करीत असावेत, असा दाट संशय व्यक्त करण्यात येत आहे. ड्रमसह संपूर्ण बाटल्या आरपीएफच्या पथकाने जप्त केल्या. या सिझनची ही पहिलीच धडाकेबाज कारवाई वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त भवानी शंकर नाथ यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक गौरीशंकर एडले, एन.पी. वासणिक, जसबिरसिंह, दीपक पवार, शकील शेख, बी.बी. यादव आणि संजय खंडारे यांनी केली.

बाटल्यांचे १०० झाकनही मिळाले
विशेष म्हणजे पाण्याचा गोरखधंदा करणाºयांनी बाटलीचे झाकन दुकानातून खरेदी केले असावेत. यावेळी बाटल्यांचे १०० झाकन मिळाले. बाटलीत पाणी भरल्यानंतर त्यावर झानक लावून प्रेशर दिल्यास सील लागल्याचे दिसून येते. एखाद्या प्रवाशाने ती बाटल खरेदी केल्यानंतर बाटलीवर सील असल्याचे त्याला जानवते.

रेल्वेत रेल नीर बंधनकारक
रेल्वे बोर्डाने रेल्वे गाड्यात आणि स्टेशनवरील स्टॉवर रेल नीरचेच पाणी विकने बंधनकारक केले आहे. सध्या नागपुरात प्लांट अद्याप सुरू झाला नाही. त्यामुळे बिलासपुरहून रेल नीर मागविले जात आहे. पाण्याची मागणी वाढत असल्याने आणि रेल नीर बंधनकारक असल्याने हा अफलातून फंडा वापरला आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement