Published On : Thu, Aug 30th, 2018

रेल्वेतील मृतांच्या नातेवाईकांचा शोध लागला

Advertisement

नागपूर: आर्थिक फसवणुक करुन रेल्वेने पळून जाणाºया मृतांच्या नातेवाईकांचा शोध लागला. नातेवाईक म्हातारे असल्याने मृतांचे पार्थिव ताब्यात घेण्यास ते असमर्थ होते. मात्र, मृतांचे अन्य नातेवाईकांचा शोध लागु शकला नाही.

राजकुमार आरमुगम (४८), सिल्वासिल्वी मरुयेसम (३२, दोन्ही रा. कन्याकुमार) अशी मृतांची नावे आहेत. त्यांच्यावर कन्याकुमारी येथील गुन्हे शाखेत एक कोटी ६० लाख रुपयांची फसवणुक केल्याचा गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी आता पर्यंत १० फिर्यादी पुढे आल्याची माहिती सूत्राकडून मिळाली आहे.

सूत्राकडून मिळालेल्या माहिती नुसार एर्नाकूलम- पाटणा एक्स्प्रेसमध्ये आढळलेल्या दोघांचा संशयास्पद मृत्यू झाला. नातेवाईक न आल्यामुळे लोहमार्ग पोलिसांनी त्यांचे पार्थिक नागपुरातच दफन केले. दरम्यान या घटनेचा तपास लोहमार्ग स्थानिक गुन्हे शाखेला (एलसीबी) देण्यात आला आहे.

या प्रकरणी एलसीबीच्या पथकाने एर्नाकूलम च्या बोगीतील प्रवाशांचे बयान नोंदविले. मात्र, या घटनेचे रहस्य अजुनही कायम आहे. त्यांनी स्थानिकांना पैसे दुप्पट करुन देण्याचे आमिष दाखविले. त्यांच्या आमिषाला बळी पडत अनेकांनी गुंतवणुक केली. कोटींच्यावर रक्कम गोळा करुन हे दोघेही रेल्वेनी पळून जात होते. पोलिसांना मृतांजवळ ४८ हजार रुपये रोख मिळाली. मात्र, उर्वेरीत रक्कम कुठे आहे. गाडीत तिसरा कोणी होता काय. त्यांची हत्या की आत्महत्या असे अनेक प्रश्न यानिमीत्ताने उपस्थित होत आहेत. पोलिस तपासात या घटनेचा खुलासा होईलच मात्र, याघटनेविषयी सत्यता जाणुन घेण्यासाठी अनेकांना उत्सुकता आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय पान्हेकर यांच्या नेतृत्वात या घटनेचा तपास सुरु आहे.

अशी झाली घटना
सोमवार २० आॅगस्ट रोजी आरपीएफला मिळालेल्या माहिती नुसार एर्नाकूलम – पाटणा एक्स्प्रेसच्या एस-५ बोगीत १० व ११ नंबरच्या बर्थवरुन युगुल एक कोटी ६० लाख रुपये आणि सोनं घेवून जात आहेत. या माहितीच्या आधारावर नागपूर रेल्वे स्थानकावर त्यांची झडती घेण्यात आली होती. मात्र, त्यांच्याकडे काहीच आढळले नाही. त्यामुळे तामिलनाडू पोलिसांशी संपर्क करण्याचाही प्रयत्न झाला.

मात्र, संपर्क होऊ शकला नाही. गाडी सुटण्याची वेळ झाल्याने दोघांनाही गाडीत बसविले. नरखेड रेल्वे स्थानकाजवळ गाडी पोहोचताच दोघेही बेशुध्दावस्थेत आढळले. त्यांना आरपीएफ जवानांनी नरखेड येथील शासकीय रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. त्यांच्या जवळ मिळालेल्या कागदपत्रावरुन ओळख पटली आहे.