Published On : Thu, Aug 30th, 2018

मोहफुलांच्या हातभट्टयावंर पोलिसांचे धाडसत्र

Advertisement

रामटेक: रामटेक परिसरात सध्या पोलिसांनी अवैध व मोहफुलांच्या हातभट्टी दारूनिर्मिती व विक्रेत्याविरोधात कंबर कसलेली असून सातत्याने सुरू असलेल्या धाडीमुळे मोठ्या प्रमाणावर मुद्देमाल जप्त करण्यात येत आहे.रामटेक जवळील नगरधन शिवारातील भागेरठी नाल्यात मोठ्या प्रमाणावर हातभट्टीवर मोहाफूल दारु गाळत असल्याची गुप्त माहिती गुप्तचर शाखेला मिळताच नागपुर पथकाने छापामार कारवाई केली. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहीतीच्या आधारे या दारु भट्टीवर धाड टाकुन जवळपास १ लाख ७७ हजार १४० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

नगरधन शिवारात आज बुधवारी सायंकाळी चार वाजताचे सुमारास टाकलेल्या धाडीत एका आरोपीला अटक करण्यात आली असुन एक आरोपी पळुन जाण्यात यशस्वी झाला.

Gold Rate
28 July 2025
Gold 24 KT 98,500 /-
Gold 22 KT 91,600 /-
Silver/Kg 1,13,800/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार नगरधन शिवारात भागेरती नाल्यात चोरुन लपुन अवैध मोहफुल हात भट्टीवर महुआ दारु काढत असल्याची माहीती गुप्तचर शाखा नागपुर ला प्राप्त झाली होती. त्या आधारे पोलीसांनी हात भट्टीवर धाड टाकली.आरोपी राकेश नागपुरे व रवि दमाहे हे हात भट्टीवर दारु काढतांना मिळाले. यातील आरोपी राकेश नागपुरे हा पोलीसांना चकमा देवून पसार झाला.तर रवि दमाहे याला पकडण्यांत आले.

आरोपींच्या ताब्यातुन मोहफुल सडवा १५ लिटर ची डपकी ,दारु काढण्याचे साहीत्य ,दोन रनींग भट्टी, २४८ लिटर दारु असा एकुण १ लाख ७७ हजार १४० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.

ही कारवाई नागपुर जिल्हा ग्रामीण पोलीस अधिक्षक राकेश ओला,अतिरिक्त पोलीस अधिक्षक मोनिका राऊत, उपविभागीय पोलीस अधिकारी नयन आलुरकर, पोलीस निरिक्षक संजय पुरंदरे,अनिल राऊत पोलीस सहनिरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली राजेंद्र सनोडीया,शैलेश यादव,अमोल वाघ,साहेबराव बहाडे,उमेश ठाकरे या पोलीस शिपायांनी यशस्वी कारवाही केली.रामटेक पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहै.

Advertisement
Advertisement