Published On : Thu, Dec 6th, 2018

नागपूरच्या इतवारी-इमामवाड्यातील जुगार अड्ड्यांवर धाडी

नागपूर : तहसील व अजनी पोलीस ठाणे परिसरात इतवारी आणि इमामवाडा येथे सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकून पोलिसांनी १६ आरोपीला पकडले. परंतु या कारवाईत जप्त करण्यात आलेल्या रोख रकमेत मोठा गोलमाल झाल्याची माहिती आहे.

इमामवाडा पोलिसांनी केवळ पाच आरोपीकडून २२,५३० रुपयासह ३५ हजाराचा माल जप्त केला तर तहसील पोलिसांनी व्यापारिक क्षेत्र असलेल्या इतवारी येथून ११ आरोपीकडून केवळ २१,२५० रुपये जप्त केल्याचे दाखविले आहे. त्यामुळे जुगार अड्ड्यावरील धाडीत जप्त करण्यात येणाऱ्या रकमेत गोलमाल होत असल्याचे या आठवड्यातील दुसरे प्रकरण आहे.

Gold Rate
13 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,09,800 /-
Gold 22 KT ₹ 1,02,100 /-
Silver/Kg ₹ 1,29,000/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

तहसील पोलिसांना इतवारी भाजी मंडीत एका साडी स्टोर्सजवळ गुन्हेगार जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली. या आधारावर मंगळवारी रात्री उशिरा भाजीमंडीत धाड टाकण्यात आली. तेथून ११ आरोपीला जुगार खेळताना पकडले. यात अंकुश पिंटू बागडी, रा इतवारी, गौरव राजू यादव, रा. चित्रा टाकीज, मो. आरिफ शेख अहमद (३०)रा. हसनबाग, हितेश फुलचंद करवाडे (३०) रा.कुंभार टोली, शेख हारून मो. (३५) रा. लोहारपुरा, राहुल सिसोदिया (३०) रा. नंदनवन, अफजल शेख (२८) रा. मिनी माता नगर, अमित जमनाप्रसाद श्रीवास्तव (३४) रा. बजेरिया, योगेंद्र बनोदे (३२) रा. शिवाजी नगर, विनोद कुराडकर (२८) रा.शिवाजी नगर आणि अंगद शत्रघ्न यादव (२२) रा.फव्वारा चौक हे सापडले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन २१,२५० रुपये जप्त कले. अटक करण्यात आलेले आरोपी अनेक दिवसांपासून सक्रिय आहेत. एका आरोपीच्या विरुद्ध चेन स्नॅचिंगचा गुन्हा दाखल आहे. तर इतरही विविध प्रकरणात सामील आहेत.यानंतरही पोलिसांना त्यांच्याजवळून केवळ २१,२५० रुपये सापडल्याने आश्चर्य आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून वाहन किंवा मोबाईल जप्त केल्याचाही उल्लेख केलेला नाही.

त्याचप्रकारे झोन चारचे डीसीपी नीलेश भरणे यांच्या चमूने इमामवाड्यातील सिरसपेठ येथे सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर बुधवारी सायंकाळी धाड टाकली. तेव्हा त्यांना तिथे अतुल अशोकराव काकडे (४०) रा. भोलेनगर, विनोद बकारामजी गायधने (४८) रा. चंद्रभागा नगर, कृष्णा डोमाजी वाडीभस्मे (४४) महात्मा गांधी नगर, प्रमोद भाऊराव बागवान (४३) रा. उदयनगर आणि वसीम शेख लतीफ शेख (३४) रा. ताजनगर हे जुगार खेळताना सापडले.

पोलिसांनी त्यांच्याकडून २२, ३५० रुपयासह ३५ हजाराचा माल जप्त केला. दोन्ही प्रकरणात जप्त करण्यात आलेल्या रकमेवरून अनेक प्रश्न निर्माण झाले आहे.
गेल्या आठवड्यात याच प्रकारे यशोधरानगर पोलीस ठाणे परिसरात जुगार अड्ड्यावर कारवाई दरम्यान रोख रकमेत गोलमाल करण्यात आले होते. हे प्रकरण दाबण्यात आले. ताज्या प्रकरणातही रोख रकमेचा गोलमाल झाल्याची चर्चा आहे.

Advertisement
Advertisement