Published On : Fri, May 7th, 2021

सैलाबनगर च्या बोगस धर्मार्थ रुग्णालयावर धाड

– लाखो रुपये किमतीचा अवैध औषधसाठा जप्त, बोगस डॉक्टर अटकेत

कामठी :-स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या सैलाबनगर परिसरात मागिल दहा वर्षांपासून सुरू असलेला धर्मार्थ रुग्णालय हे बोगस रुग्णालय असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी आरोग्य विभागाशी केलेल्या चौकशी शहनिषेत रुग्णालयाची कुठलिही नोंद दिसून न आल्याने आज दुपारी 2 वाजता नगर परिषद आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन तसेच तहसील प्रशासनाने सैलाबनगर येथे सुरू असलेल्या धमार्थ रुग्णालयावर धाड घातली असता रुग्णालयात असलेला औषधसाठा हा अवैध आढळला असून खरेदीची कुठलीही पावती दिसून आल्या नाही तसेच सदर डाक्टर हा सुदधा झोलाछाप दिसून आल्याने सदर डाक्टर ला ताब्यात घेत कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला.अटक या बोगस डॉक्टर चे नाव चंदन नरेश मोहबे वय 45 वर्षे रा सैलाबनगर कामठी असे आहे.

सदर धर्मार्थ रुग्णालयातून सर्दी, खासी , बुखार यासह आदी रुग्णावर उपचार सुरू होता मात्र सद्या सुरू असलेल्या कोरोणाच्या प्रकोपात रुग्णांची धाव या रुग्णालयाकडे असल्याने या रुग्णालयातून कोविड उपचार सुद्धा सुरू होते त्यातच रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा सुद्धा देणे सुरू होते मात्र हा सर्व उपचार बोगस पद्धतीने सुरू असून रुग्णांचा विश्वासघात करून सर्रास आर्थिक लुट सुरु होती तसेच इतकेच नव्हे तर कित्येकांना संतान प्राप्त होण्याच्या उपचारासह लैंगिक समस्यांचा उपचार सुद्धा या रुग्णालयातून सुरू होता .मात्र पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीतुन आज पोलीसानी घातलेल्या धाडीतून या धमार्थ रुग्णालयाचा बोगस कारभार चव्हाट्यावर आणण्यात यश आले.या बोगस रुग्णालयातून ऑक्सिजन सिलेंडर, थरमामीटर, गर्भपात गोळ्या, सेक्सवर्धक गोळ्या यासह इतर औषधी साठा जप्त करण्यात आला यानुसार जवळपास दीड लक्ष रुपये किमतीचा अवैध औषधीसाठा जप्त करण्यात आला.व बोगस डाक्टर ला ताब्यात घेत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आले.


ही यशस्वी कारवाही डीसीपी निलोतपल, एसीपी रोशन पंडित, यांच्या मार्गदर्शनार्थ वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय मालचे, दुय्यम पोलीस निरीक्षक काळे, एपीआय सुरेश कँनाके,पोलीस उपनीरीक्षक श्याम वारंगे, रविकांत बंड, यासह आदी पोलीस अधिकारी कर्मचारी यासह नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ शबनम खानुनो, महसूल विभागाचे नायब तहसीलदार रणजित दुसावार, मंडळ अधिकारी महेंद्र कांबळे, आदींनी केली असून पुढील तपास सुरू आहे