| | Contact: 8407908145 |
  Published On : Thu, Jun 6th, 2019

  धंतोलीतील क्रिकेट सट्टा अड्ड्यावर छापा

  Cricket Betting

  Representational Pic

  नागपूर NAGPUR : धंतोलीतील DHANTOLI गजानननगरात सुरू असलेल्या क्रिकेट सट्टा अड्ड्यावर CRICKET BETTING DEN  छापा घालून गुन्हे शाखेच्या पथकाने दोन बुकींना अटक केली. त्यांच्याकडून लॅपटॉप, मोबाईल, टीव्हीसह ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

  एफसीआय गोदामाजवळ असलेल्या नवजीवन कॉलनीत अरिहंत अपार्टमेंटच्या पहिल्या माळ्यावर प्रकाश राठींची सदनिका आहे. १०१ क्रमांकाच्या या सदनिकेत पंकज गणेश मेहाडिया (वय ३९, रा. सीताबर्डी) आणि उदय अशोक आस्वले (वय २२, रा. गणेशपेठ) हे दोघे आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यावर सट्टा घेत होते.

  सहायक पोलीस निरीक्षक योगेश एस. चौधरी यांच्या माहितीवरून गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी रात्री ९ च्या सुमारास तेथे छापा मारून या दोघांना भारत आणि साऊथ आफ्रिकेदरम्यान सुरू असलेल्या क्रिकेट सामन्यावर खायवाडी करताना पकडले. लॅपटॉपवर श्री गजानन नावाचे सॉफ्टवेअर डाऊनलोड करून त्याआधारे मेहाडिया आणि आस्वले बेटिंग करीत होते. त्यांच्या ताब्यातून पोलिसांनी लॅपटॉप, टीव्ही, मोबाईलसह ७४,५१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

  गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त नीलेश भरणे, सहायक आयुक्त सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नरेंद्र हिवरे, सहायक निरीक्षक योगेश चौधरी, पोलीस उपनिरीक्षक एच. एस. थोरात, हवालदार शैलेष पाटील, नायक राकेश यादव, हरीश बावणे, विकास पाठक, सत्येंद्र यादव यांनी ही कामगिरी बजावली.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145