Published On : Thu, Jun 7th, 2018

राहुल गांधीना व्यसनमुक्ती केंद्रात जाण्याची गरज; आमदाराचे विवादित ट्विट

नवी दिल्ली : भाजपाच्या पाठिंब्यावर दिल्लीतील राजौरी गार्डन पश्चिम या विधानसभा मतदारसंघातुन निवडून आलेले शिरोमणी अकाली दलाचे आमदार मनजिंदर सिंग सिरसा यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर विवादित ट्विट करत नवा वाद घातला आहे. राहुल गांधी व्यसनी असून पंतप्रधान होण्याची त्यांची लायकी नाही, अशी टीका मनजिंदर सिंग यांनी केली आहे.

मनजिंदर सिंग यांनी ट्विट केलेल्या व्हिडीओमध्ये राहुल गांधी विमानतळावर रांगेत उभे असल्याचं दिसत आहे. ‘पंजाबमधील ७० टक्के तरुणांना अमली पदार्थांचं व्यसन आहे असं म्हणणारा व्यक्तीच आज व्यसनी दिसत आहे’, असं कॅप्शनही त्यांनी व्हिडीओला दिलं आहे.

राहुल गांधी यांचा चेहरा पंतप्रधानपदासाठी लायक नसून त्यांनी तर आधी व्यसनमुक्ती केंद्रात जायला हवं, असंही ते म्हणाले आहेत. ‘माझं म्हणणं ज्यांना मान्य असेल त्यांनी रिट्विट करावं, असं आवाहनही त्यांनी ट्विटर युजर्सला केलं आहे.