Published On : Fri, Sep 13th, 2019

राहूल प्रियंका गांधी सेना विदर्भ कार्यकर्ता मेळावा संपन्न…..

नागपूर : रविभवन, नागपूर येथे राहुल प्रियंका गांधी सेना विदर्भ कार्यकर्ता मेळावा रविभवन येथे नुकताच संपन्न झाला असून या मेळाव्यात मुख्य अतिथि मा.अभिजीत फाळके (प्रदेश अध्यक्ष ) सौ. तेजस्वीताई बरबडे (पाटील) महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष रवीभाऊ गाडगे पाटील, नागपूर शहर उपाध्यक्ष, मा.वसीम खान नागपूर शहर उपाध्यक्ष (युवक काँग्रेस ) व मा . गोपालपट्टम यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक राहुल प्रियंका गांधी सेना विदर्भ अध्यक्ष सौ.रुबी पठान यांच्या अध्यक्षतेखाली महादेवराव सातपुते अकोला जिल्हा अध्यक्ष, सौ.किशोरीताई गणवीर -नागपूर शहर अध्यक्ष (महिला) सौ.वंदनाताई शेवतकर -नागपूर शहर उपाध्यक्ष, सौ.रेखा वाघमारे नाग.शहर महासचिव, सय्यद वसिम -नाग.शहर महासचिव व नागपूर शहर सचिव:- साजिया खान, शाहजहाँ खान, रेहाना खान, सय्यद अलीम, नाजिया खान यांना पदावर नियुक्ती करून भविष्यात काँग्रेसला मजबूत करण्यास आवाहन करण्यात आले. या मेळाव्याला मोठया संख्येने नागरिक व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी संचालन मा.हाफिज पठाण यांनी केले तर आभार प्रदर्शन राहुल प्रियंका गांधी सेनेचे नागपूर शहर उपाध्यक्ष नसीम सय्यद यानी मानले.