Published On : Wed, Feb 16th, 2022
By Nagpur Today Nagpur News

गुणवत्तापूर्ण शिक्षण हाच मजबूत पाया- श्री खुशालराव पाहुणे

Advertisement

धर्मराज प्राथमिक शाळेच्या रौप्य महोत्सवाच्या लोगोचे अनावरण.

नागपुर : – गुणवत्तापूर्ण शिक्षण याच धर्तीवर मार्गक्रमण करीत धर्मराज प्राथमिक शाळेची गेल्या २५ वर्षांची वाटचाल राहिली असून यात कुठलीही तडजोड होणार नसल्याचे मनोगत श्री खुशालराव पाहुणे यांनी व्यक्त केले.

Gold Rate
07 May 2025
Gold 24 KT 97,500/-
Gold 22 KT 90,700/-
Silver/Kg 96,700/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

धर्मराज प्राथमिक शाळेच्या २५ वर्षपूर्तीनिमित्त “रौप्य महोत्सव” लोगोचे आज (ता १४) अनावरण करण्यात आले आले. त्यावेळी ते बोलत होते. धर्मराज शैक्षणिक परिसरात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी इंदिरा एज्युकेशन सोसायटी पिवळी नदी नागपु रचे संस्थापक अध्यक्ष श्री खुशालराव पाहुणे उपस्थित होते. तर प्रमुख अतिथी म्हणून पिवळी नदी नागपुरचे मुख्याध्यापक श्री सुनील झलके, धर्मराज विद्यालया च्या मुख्याध्यापिका सौ पमिता वासनिक, उपमुख्या ध्यापक श्री रमेश साखरकर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री खिमेश बढिये, ज्येष्ठ शिक्षक श्री दिनेश ढगे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री खिमेश बढिये यांनी करुन शाळेच्या २५ वर्षांतील कार्यकिर्दीचा आढावा सादर केला. आगामी वर्षभर “रौप्य महोत्सवी वर्षां” निमित्ताने विद्यार्थी व समाज पूरक राबविण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती दिली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून बोलताना श्री खुशालराव पाहुणे यांनी धर्मराज शैक्षणिक संस्थेने गुणवत्ता, प्रामाणिकता, कठोर मेहनत व विद्यार्थी हित या बाबीला प्राधान्य दिले. यातूनच संस्थेने आपला एक वेगळा ठसा उमटविला. यातीलच धर्मराज प्राथमिक शाळेने २५ वर्षांची यशस्वी वाटचाल केली असून अशीच वाटचाल गुणवत्तापूर्ण शिक्षणातून शिक्षकांनी कायम ठेवावी असे मनोगत व्यक्त केले.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी समयोचित मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री भिमराव शिंदेमेश्राम यांनी तर उपस्थितांचे आभार श्री अमीत मेंघरे यांनी व्यकत केले. कार्यक्रमाला सौ चित्रलेखा धानफोले, श्री भिमरा व शिंदेमेश्राम, श्री अमीत मेंघरे, श्री किशोर जिभकाटे, श्री राजू भस्मे, कु. शारदा समरीत, कु अर्पणा बावनकु ळे, कु हर्षकला चौधरी, कु प्रिती सुरजबंसी, कु पूजा धांडे व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Advertisement
Advertisement