Published On : Fri, Jul 17th, 2026
By Nagpur Today Nagpur News

इंग्लंड दौऱ्यातील अपयश मागे सारत वैभव सूर्यवंशीची नव्या जोमाने तयारी; तळेगावात सरावाला सुरुवात

Advertisement

नागपूर : इंग्लंड दौऱ्यात अपेक्षित कामगिरी करता न आल्याने खचून न जाता भारताचा १५ वर्षीय युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी आता नव्या उमेदीने तयारीला लागला आहे. नागपूर-अमरावती मार्गावरील तळेगाव (श्यामजीपंत) येथील राजस्थान रॉयल्सच्या हाय परफॉर्मन्स प्रशिक्षण केंद्रात त्याने विशेष सराव सुरू केला आहे.

तळेगावात पोहोचल्यानंतर वैभवने प्रथम हनुमान मंदिरात दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला. त्यानंतर प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षक आणि खेळाडूंनी त्याचे ‘गार्ड ऑफ ऑनर’ देऊन स्वागत केले.

Gold Rate
Aug 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 60,000 /-
Gold 22 KT ₹ 1,48,500 /-
Silver/Kg ₹ 2,41,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

राजस्थान रॉयल्सचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वैभव आपल्या फलंदाजीतील तांत्रिक त्रुटींवर मेहनत घेत आहे. विशेषतः वेगवान आणि उसळत्या चेंडूंचा सामना करण्यावर भर देण्यात आला असून, शॉर्ट पिच चेंडूंविरुद्धची तंत्र सुधारण्यासाठी कठोर सराव सुरू आहे.

आयपीएलमधील दमदार कामगिरीनंतर वैभवची भारतीय टी-२० संघात निवड झाली होती. आयर्लंड दौऱ्यात त्याला संधी मिळाली नव्हती, तर इंग्लंडविरुद्धच्या तीन टी-२० सामन्यांत त्याला अनुक्रमे १४, १३ आणि १५ धावाच करता आल्या. इंग्लंडच्या वेगवान आणि उसळत्या खेळपट्ट्यांवर त्याच्या तंत्राची कठीण परीक्षा झाली.

Advertisement

सध्या सुरू असलेल्या सरावात वैभव हेलिकॉप्टर शॉटसह आक्रमक फटके खेळण्याचा सराव करत असून, त्याच्या फुटवर्क, टाइमिंग, पुल आणि हुक शॉट्सवर विशेष मेहनत घेतली जात आहे.

तळेगावातील सराव पूर्ण झाल्यानंतर वैभव थेट भारतीय संघात दाखल होणार आहे. २३, २५ आणि २६ जुलै रोजी झिम्बाब्वेविरुद्ध होणाऱ्या टी-२० मालिकेत त्याला स्वतःची क्षमता सिद्ध करण्याची मोठी संधी मिळणार आहे.

क्रिकेट तज्ज्ञांच्या मते, कमी वयात आंतरराष्ट्रीय अनुभव घेतल्यानंतर स्वतःतील उणिवा दूर करण्यासाठी वैभवने घेतलेली मेहनत त्याच्या उज्ज्वल भविष्याची नांदी ठरू शकते. जर त्याने शॉर्ट पिच चेंडूंवरील तंत्र अधिक सक्षम केले, तर भारतीय क्रिकेटला भविष्यात एक विश्वासार्ह आणि आक्रमक फलंदाज मिळू शकतो.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.