Published On : Thu, Nov 26th, 2020

नागपूरला स्वच्छता रॅकिंग मध्ये पहिल्या दहा मध्ये आणा : आयुक्त

उत्कृष्ठ सफाई कामगारांचा सत्कार

नागपूर : नागपूरला स्वच्छता सर्वेक्षण २०२०-२०२१ च्या रॅकिंग मध्ये पहिल्या दहा शहरात आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यासाठी सर्वात मोठी जबाबदारी सफाई कामगारांची आहे कारण फील्डवर ते काम करतात. त्यांनी आपले कर्तव्य प्रामाणीकपणे पार पाडले तर नागपूर पहिल्या क्रमांकावर येऊ शकते, हे उदगार महानगरपालिकेचे आयुक्त श्री. राधाकृष्णन बी यांनी “उत्कृष्ठ कामगार सत्कार समारोह” कार्यक्रमामध्ये व्यक्त केले.

Advertisement

स्वच्छता सर्वेक्षण २०२०-२०२१ च्या अनुषंगाने “उत्कृष्ठ कामगार सत्कार समारोह” गुरुवार (२६ नोव्हेंबर) ला सतरंजीपुरा झोन क्र. ७ कार्यालय येथे मा.आयुक्त श्री. राधाकृष्णन बी. यांचे हस्ते पार पडला. या समारोहात घनकचरा व्यवस्थापन विभागातील प्रभाग क्र. ५, २० व २१ चे सफाई कर्मचा-यांपैकी तीन सफाई कामगार १) श्रीमती निलम सुरेश तांबे, प्रभाग ०५, २) श्री. सागर प्रभु सिपाई प्रभाग २० व श्रीमती पुनम अनिल हजारे प्रभाग २१ यांची निवड करण्यात आली असुन त्यांना आपले काम नियमितपणे, उत्तमपणे व जबाबदारीने करीत असल्यामुळे “उत्कृष्ठ सफाई कामगार” चे प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ व शाल/श्रीफळ देऊन मा.आयुक्त श्री. राधाकृष्णन बी. यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.

आयुक्त पुढे म्हणाले की, शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी ओला व सुका कचरा वेगवेगळा करणे आवश्यक आहे. नागरिकांना याबददल जागृत करणे आणि वेगवेगळया डस्टबिनमध्ये कचरा ठेवण्यासाठी प्रोत्साहित करण्याची मनपाची जबाबदारी आहे. त्यांनी सांगितले की, मनपा कडून स्वच्छते मध्ये बरीच सुधारणा करण्यात आली आहे. अगोदर मनपाची रॅकिंग ५८ वर होती ती आता १८ वर आली आहे. सगळयांच्या प्रयत्नाने आता याला पहिल्या दहा मध्ये आणायचे आहे. स्वच्छतेचे कार्य वर्षभर केल्यानंतर नागरिकांकडून सुध्दा योग्य प्रतिसाद भेटेल.

आयुक्त म्हणाले की सध्या तीन उत्कृष्ठ सफाई कामगारांचा सत्कार करण्यात आला आहे. पुढच्या वर्षी सर्वांचा सत्कार होईल, यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, त्यांनी सांगितले की ऐजवदारांना नियमित करण्यात येत आहे. सफाई कामगारांचे बाकीचे प्रश्न सुध्दा सोडविण्यात येतील.

यावेळी अतिरिक्त आयुक्त श्री संजय निपाणे यांनीपण मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी उपायुक्त व संचालक घनकचरा व्यवस्थापन डॉ. प्रदीप दासरवार, झोनचे सहा.आयुक्त श्री. ‍विजय हुमणे तथा झोनचे सर्व अधिकारी व कर्मचारी आदी सहभागी झाले.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement