Published On : Fri, Sep 1st, 2017

मारामारी सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिस उपनिरीक्षकास धक्काबुक्की

Advertisement
crime

Representational Pic

राहाता: दोन गटांत सुरू असलेली मारामारी सोडवण्यास गेलेल्या पोलिस उपनिरीक्षकास धक्काबुक्की करण्यात आली. या प्रकरणी साकुरी येथील तिघांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. ही घटना बुधवारी रात्री साडेनऊ वाजता चितळी रस्त्यावरील सुमित फॅशन या दुकानासमोर घडली.

उपनिरीक्षक विशाल वाठोरे त्यांचे सहकारी गणेशोत्सवात पेट्रोलिंग करत असताना दोन गटांत भांडण सुरू असलेले दिसले. वाठोरे यांनी किशोर दंडवते, संदीप बनसोडे, सचिन बनसोडे यांना विचारणा केली असता तिघांनी त्यांनाच धक्काबुक्की केली. वाठोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी किशोर दंडवते, संदीप बनसोडे, सचिन बनसोडे यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. न्यायालयाने तिघांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. एका गटाची विसर्जन मिरवणूक सुरू असतानाच ही मारामारी झाली. मिरवणूक बंद करून विसर्जन झाले.

सामान्यांचे काय?
शहरातगुंडगिरीने गेल्या काही दिवसांपासून हैदोस घातला आहे. पोलिसांची भीतीच राहिली नाही. यापूर्वीचे पोलिस निरीक्षक देविदास पवार रजेवर गेल्यापासून गुन्हेगारांच्या टोळ्यांनी डोके वर काढले आहे. वचक असलेला अधिकारी नसेल, तर गुंडांची पोलिसांनाच धक्काबुक्की करण्याची मजल जात असेल, तर सामान्य लोकांचे काय असा प्रश्न पडला आहे