Published On : Tue, Aug 22nd, 2017

पेट्रोल भरणाऱ्यांनो सावधान; या शहरातील पंपावर पेट्रोल ऐवजी निघाले पाणी

Advertisement

पुणे: राज्यात पेट्रोल चोरीच्या घटना घडत असतानाच शिरूर शहरातील भारत पेट्रोलियम या कंपनीच्या पेट्रोल पंपामधून पेट्रोल येण्या ऐवजी चक्क पाणीच येत होते. त्यामुळे पेट्रोल या पंपावरून पेट्रोल भरून निघालेल्यांची मोठी तारांबळ उडाली. आपल्या गाडीत पेट्रोल असल्याचे समजून काही अंतरावर जाणाऱ्या लोकांच्या गाड्या बंद पडल्या. यानंतर टाकीत भरलेले पेट्रोल नाही तर पाणीच असल्याचे त्या सर्वांच्या निदर्शनात आले.

या प्रकरणी संतप्त नागरिकांनी शिरूर तहसिलदारांकडे तक्रार केली. त्यावर वेळीच तहसीलदार रणजीत भोसले यांनी वरिष्ठ पेट्रोलियम अधिकाऱ्यांनी ही बाब कळवली. यानंतर संबंधित पेट्रोल पंपावर धाड टाकून पेट्रोलचे नमुणे प्रयोगशाळेत तपासासाठी पाठवण्यात आले आहेत. तसेच पेट्रोल पंपावरील व्यवहार पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.

Gold Rate
13 May 2025
Gold 24 KT 94,300/-
Gold 22 KT 87,700/-
Silver/Kg 97,300/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above
Advertisement
Advertisement