Published On : Mon, Aug 28th, 2017

पुणे-नाशिक महामार्गावर एसटी, ट्रकचा अपघात: 9 जणांचा जागीच मृत्यू; असा घडला अपघात

पुणे: नाशिक आणि पुणे महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात 9 जणांचा जागीच मृत्यू झाला. रात्री उशीरा घडलेल्या या अपघातात 15 जण जखमी आहेत. त्यांच्यावर नारायणगाव व आळेफाटा येथील रूगणायांमध्ये उपचार सुरू आहेत.

असा घडला अपघात…
महामार्गावर एक ट्रक पंक्चर झाला होता. तो पंक्चर काढण्यासाठी ट्रक चालक आणि क्लीनर हे दोघे खाली उतरून जॅक लावत होते. त्याचवेळी येणाऱ्या भरधाव बसची ट्रकला धडक बसली. यात ट्रक चालक, क्लीनरसह 7 प्रवाशांचा मृत्यू झाला. अपघात एवढा भीषण होता, की एसटी बसचा अर्धा भाग कापला गेला आहे.

एम.एच. 14 बी.टी. 4351 ञ्यंबकेश्वर (नाशिक)-पुणे ही एस.टी. बस ञ्यंबकेश्वर (नाशिक) वरुन निघाली होती. पुणे-नाशिक महामार्गावर नारायणगाव जवळ रस्त्यावर उभ्या असलेल्या आयशर ट्रकवर आदळली. या भीषण अपघातात 9 जण जागीच ठार झाले आहेत. हा अपघात राञी 1:15 वाजेच्या सुमारास घडला. बस मध्ये एकूण 27 प्रवासी होते. तर जखमींपैकी अनेक जण गंभीर असून मृतांचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे. सर्व जखमींना उपचारासाठी नारायणगाव व आळेफाटा येथील रूगणायांमध्ये दाखल करण्यात आले आहे.

मृतांची नावे (एसटी बस)
1) शोभा नंदू पगार (वय-45) मु उतराने, बागलाल सटाणा

2) यमुना बिला पगार (वय 55) सटाणा


3) संकेत दत्तात्रय मिस्त्री, गणेश चौक, सिडको, नाशिक

4) विकास चंद्रकांत गुजराथी (वय 50) गंगावेश, सिन्नर

5) सागर कृष्णलाल चौधरी (वय 30)

6) अभिशेख जोशी

7) कैलाश विठ्ठल वायकर
——–
8) किशोर यशवंत जोंधळे (वय 40) कोकणगाव संगमनेर
9) जाकीर गुलाब पठाण (30), आयशर ट्रक चालक

जखमी (भोसले हॉस्पिटल)
1) नंदू सीताराम पगार – 58

2) संतोष जयसिंग गुलदगड – 32

3) दीपक चंद्रकांत लांडगे – 31

4) संतु तुळशीराम बावसार – 52

5) तुकाराम जंग्या पावरा – 56

6) सूर्यकांत धोंडीराम घाडगे – 57
—–

नारायनगाव ग्रामीण हॉस्पिटल
7) गणेश एकनाथ घोंगडे – 25, भोसरी, उपचार करून सोडले

8) रमेश रामदास शेळके – 44

9) ज्ञानेश्वर रमेश शेळके – 40

धांडे हॉस्पिटल
10) अरुण लक्ष्मण शिंदे – 23

11) सुधीर तील बागवाने – 49

12) तुषार दशरथ करळे -29

13) प्रवीण गमसेवक दुबे – 38