Published On : Wed, Jun 30th, 2021

महापौर राखी कंचर्लावार यांच्या वाढदिवसानिमित्त संकल्पपूर्ती पुस्तिकेचे प्रकाशन

Advertisement

चंद्रपूर : चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या महापौर राखी संजय कंचर्लावार यांचे कार्यकर्तृत्व सांगणाऱ्या ‘संकल्पपूर्ती’ पुस्तिकेचे मंगळवारी (ता. 29) साईसुमन निवासस्थानी त्यांच्या जन्मदिनानिमित्त विमोचन करण्यात आले.

यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, भाजपा नेते प्रमोद कडू, उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती रवी आसवानी, सभागृह नेता संदीप आवारी, जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे, नगरसेवक संजय कंचर्लावार, नगरसेवक विशाल निंबाळकर, नगरसेविका छबूताई वैरागडे, प्रज्वलंत कडू, सुरज पेद्दुलवार आदी उपस्थित होते.

Advertisement

नगरपालिका बरखास्त करून महानगरपालिका स्थापन झाल्यानंतर २०१२ मध्ये पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली. भानापेठ प्रभागातून राखी संजय कंचर्लावार यांनी उमेदवारी दाखल करून पहिल्याच प्रयत्नात विजयी झाल्या. राखीताईनी नगरसेवक म्हणून उत्तमरीत्या काम केले. आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली.

अडीच वर्षांनी पहिल्या महापौरांचा कार्यकाळ संपला आणि पुढील अडीच वर्षासाठी निवडणूक झाली. ३०/१०/२०१४ रोजी महापौरपदाची सूत्रे राखी संजय कंचर्लावार यांनी स्वीकारली.

२०१४ ते २०१७ या कार्यकाळात केलेल्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणारी संकल्पपूर्ती ही पुस्तिका प्रकाशित करण्यात आली. २९ जून रोजी वाढदिवसानिमित्त विमोचन करण्यात आले. दरम्यान, राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय क्षेत्रांतील मान्यवरांनी महापौर राखी संजय कंचर्लावार यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.