नागपूर: शहर आणि जिल्हयात सुरु असलेल्या विविध विकास कामांचा आढावा घेणाऱ्या नांदी परिवर्तनाची या विकास घडीपुस्तिकेचे प्रकाशन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते आज झाले.
हैद्राबाद हाऊस येथे आयोजित विशेष समारंभात जिल्हा माहिती कार्यालयाचा तयार करण्यात आलेल्या नांदी परिवर्तानाची या घडीपुस्तिकेच्या प्रकाशन समारंभास मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी श्रीमती आशा पठाण, शशांक दाभोळकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रकाश पाटील, प्रा. राजीव हडप आदी उपस्थित होते.
नांदी परिवर्तनाच्या माध्यमातून जिल्हयातील विविध विकास प्रकल्पाची माहिती देण्यात आली असून यामध्ये मेट्रोचा गतीने होणारा विकास, समृध्दी महामार्ग, पर्यटकांचे आकर्षण ठरलेल्या व्याघ्र पकल्प व त्या माध्यमातून नागपूरची वाघापूर ही नवी ओळख, जिल्हयाच्या सर्वांगिण विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, तसेच पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असल्याने विविध विकास प्रकल्प व त्यासाठी प्रथमच मोठ्या प्रमाणात निधीची उपलब्धता. जिल्हयाच्या सर्वांगिण विकाससोबत जनतेला सुलभ आणि जलद सुविधा उपलब्ध होत आहेत. यासाठी जिल्हा प्रशासनाने नागरी सुविधेसाठी विविध नाविण्यपूर्ण उपक्रमाची अंमलबजावणी सुरु केली.
प्रारंभी जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर यांनी स्वागत करुन नांदी परिवर्तनाची या सचित्र घडीपुस्तिकेबद्दल माहिती दिली.