Published On : Mon, Dec 27th, 2021

साण्डूच्याआरोग्यदर्शिकेमुळे कोरोनात आरोग्यबरोबर मानसिक पाठबळसुध्दा, मा.श्री.नितीनजी गडकरी साहेब, केंद्रीय मंत्री, रस्ते परिवहन व महामार्गयांच्या हस्ते साण्डू आरोग्यदर्शीकेच्या हिन्दी आवृत्ती-२०२२ चे प्रकाशन

Advertisement

नागपूर: आजवर / आत्तापर्यंत दिनदर्शिका म्हणजे तारीख, पंचाग, ज्योतिष, मुहूर्त यांच्या माहितीचे साधन ही ओळख होती. कोरोनामुळे सारे जग प्रचंड मानसिक दडपण अनुभवत आहेत. या महामारीमुळे आरोग्याची, मनाची काळजी घेणे हे देखील गरजेचे काम आहे,हे आता सर्वसामान्यांना नक्कीच कळले असेल. याला जोड देण्यासाठी शरीराबरोबर मन आणि आत्मा यांचे संतुलनही आता तितकेच महत्वाचे ठरत आहे तेव्हा ‘थेंबे थेंबे तळे साचे’ या उक्तीप्रमाणे साण्डू आरोग्यदर्शिकेतील माहितीचा वापर करून सर्वांनी वर्षाचे ३६५ दिवस स्वस्थ्य व सुदृढ रहावे हीच सदीच्छा. साण्डू यांनी निर्मिलेली आरोग्यदर्शिका कोरोनाच्या संकटकाळात भारतीयांना नवीन मानसिक पाठबळ देईल, असे गौरोद्गार मा.श्री.नितीनजी गडकरी साहेब यांनी काढले. गेल्या १२२ वर्षापासून गुणवत्तापूर्ण आयुर्वेदिक औषधांची निर्मिती करणाऱ्या या कंपनीने आरोग्यदर्शीकाहिन्दी आवृत्ती -२०२२ आणली आहे.

मा. श्री. नितीनजी गडकरी साहेब यांच्या हस्ते या आरोग्यदर्शीका-२०२२ च्या हिंदी आवृत्तीचे चे प्रकाशन करण्यात आले. या आरोग्यदर्शिकेची मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीन भाषेत देशभर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. यावेळीसाण्डूफार्मास्युटिकल्सलिमिटेडचे संचालक-श्री. शशांकसाण्डू, नागपूर शहरातील नामांकित डॉ. मदन कापरे, साण्डू कंपनीचे जाहिरात व्यवस्थापक श्री. मोहन आंबेकर आणि विदर्भ रिजनचे सेल्स मॅनेजर श्री. निखिल बैस हे उपस्थित होते. प्राचीन शाश्वत आयुर्वेदाचे शास्त्र साण्डू फार्मास्युटिकल्स्ने या दिनदर्शिकेच्या माध्यमातून दैनंदिन जीवनात आणले आहे. यादिनदर्शिकेमध्येदिनविशेष, तिथी,नक्षत्र, पंचाग, सुर्योदयसूर्यास्त वेळा, थोर पुरुषांच्या जयंती-पुण्यतिथी, सण, उत्सव, मासारंभ, पक्ष, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय दिवस, मुहूर्त हे आहेत. याचबरोबर आयुर्वेदाच्या मुलभूत सिध्दातानुसार शरीर, मन व आत्मा यांचे संतुलन कसे राखावे, हेही स्पष्ट करण्यात आले आहे.

आरोग्यदर्शिकेचे कौतुक करताना मा.श्री. नितीनजी गडकरी साहेब म्हणाले की, या आरोग्यदर्शिकेमध्ये प्रकृती परिक्षण, दिनचर्या, आहार विहार याबाबतच्या मुलभूत आयुर्वेदिक संकल्पना अतिशय सोप्या पध्दतीने समजावून देण्यात आलेल्या आहेत. देशाच्या सुदृढ आरोग्यासाठी साण्डू फार्मास्युटिकल्स दिवसरात्र कार्यरत आहे. त्यांच्या या उपक्रमामुळे आरोग्य जपण्याची माहिती ही आरोग्यदर्शिकादेते, असे प्रतिपादन त्यांनी केले.

आरोग्यदर्शिकेचा हेतू स्पष्ट करताना श्री शशांक साण्डू म्हणाले की, सध्याच्या कोरोनाच्या काळात मानसिक आरोग्य अतिशय महत्वाचे आहे. या दिनदर्शिकेत आम्ही शरीर, मन व आत्मा यांच्या सुदृढतेसाठी सोप्या युक्त्या सुचवल्या आहेत.अष्टांग योग आणि ध्यानधारणा याबाबतही सविस्तर माहिती या दिनदर्शिकेतून मिळते. शारीरिक व्यायामाच्या योग्य पध्दती, त्यांचे लाभ, त्यांचे सकारात्मक परिणाम तसेच अति व्यायामाचे प्रतिकूल परिणाम हेही समजावून देत आम्ही संपूर्ण आरोग्याचा विचार केलेला आहे. पचनक्रियेत अग्नीचे महत्व समजावून देण्यात आले आहे. तसेच साण्डू फार्मास्युटिकल्सच्या गुणवत्तापूर्ण आयुर्वेदिक औषधाची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे ही आरोग्यदर्शिका (दिनदर्शिका) खऱ्या अर्थाने वैशिष्ट्यपूर्ण आणि आगळीवेगळी तसेच कुटूंबाचा एक वैद्यच असल्याचे श्री. शशांक साण्डू यांनी स्पष्ट केले. ही आरोग्यदर्शिका कुटुंबाला घराच्या भिंतीवरून दैनंदिन दिनविशेष माहिती सोबत आरोग्याची योग्य मदत करेल, असा विश्वास आहे.

साण्डू’आरोग्यदर्शिका’ २०२२ ही

•आयुर्वेदाच्या मूलभूत सिद्धांतानुसार शरीर, मन व आत्मा यांचे संतुलन कसे राखावे हे सांगते.
• प्रकृती परिक्षण, दिनचर्या, आहार-विहार इ. बाबतच्या मूलभूत आयुर्वेदिक संकल्पनांबद्दलमाहिती देते.
• यामध्ये मानसिक आरोग्यालाही तितकेच महत्व दिले आहे.

• प्रत्येकाच्या शरीर, मन व आत्मा यांच्या सुदृढतेसाठी सहज सोप्या युक्त्या सुचवते.

•अष्टांगयोग आणि मेडिटेशन यांची माहिती देते.

• साण्डू आरोग्यदर्शिका शारीरिक व्यायामाच्या योग्य पद्धती, त्याचे लाभआणि त्यांचे

सकारात्मक तसेचप्रतिकूल परिणाम यांचीही माहिती देते.
•निसर्गाच्या ऱ्हासाचे शरीरावरील हानिकारक परिणाम त्याचबरोबर सकारात्मक परिणामांवरही भाष्य करते.
• पचनक्रियेतील अग्निचे महत्व विशद करते.
• तसेच साण्डू फार्मास्युटिकल्सच्या गुणवत्तापूर्ण औषधांची शास्त्रोक्त माहिती पुरवते.

देशाच्या विकासासाठी प्रगतीसाठी, सामर्थ्यासाठी जसे पायाभूत सुविधा व दळणवळणाचे सक्षम जाळे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक मनुष्याच्या सुदृढ प्रकृतीसाठी शरीर, मन आणि आत्मा यांचे संतुलन आयुर्वेदिक उपचार पद्धती द्वारे होणे तितकेच आवश्यक आहे.

जनसामान्यापर्यंत आयुर्वेदाचा प्रचार व प्रसार होण्यास साण्डू आरोग्यदर्शीका -२०२२ ची नक्कीच मदत होईल.

नवीन वर्षाच्या सर्वांना आरोग्यदायी शुभेच्छा..!

टीप: साण्डू फार्मास्युटिकल्सूची ही दिनदर्शिका मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीन भाषेत देशभर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.