मुंबई : पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी लिखित ‘झिरो पेंडन्सी अँड डेली डिस्पोजल’ या पुस्तकाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज प्रकाशन झाले.
परिषद सभागृहात झालेल्या कार्यक्रमास महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, परिवहनमंत्री दिवाकर रावते, कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, शिक्षणमंत्री विनोद तावडे, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पर्यावरणमंत्री रामदास कदम, पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर, पदुम मंत्री महादेव जानकर, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे आदी उपस्थित होते.
या पुस्तकात शासकीय व निमशासकीय काम करण्याच्या कार्यालयीन पद्धती याची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
झिरो पेंडन्सीचा पुणे पॅटर्न 18 एप्रिलपासून राज्यभर लागू होणार आहे.
Advertisement

Advertisement
Advertisement