Published On : Sun, Jun 23rd, 2019

सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री परिणय फुके यांची – दीक्षाभूमी, गणेश टेकडीला भेट

नागपूर : सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), आदिवासी विकास, वने राज्यमंत्री परिणय फुके यांनी सपत्नीक आज रविवारी दीक्षाभूमीला भेट दिली.

यावेळी त्यांच्यासोबत महापौर श्रीमती नंदा जिचकार, भंडारा-गोंदियाचे खासदार सुनिल मेंढे, आमदार डॉ. मिलिंद माने, आरोग्य समिती सभापती विक्की कुकरेजा उपस्थित होते.

दीक्षाभूमीला भेट दिल्यानंतर सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री परिणय फुके यांनी व्हैरायटी चौकातील महात्मा गांधी यांच्या पूर्णाकृती पुतळयाला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. त्यानंतर आदिवासी गोवारी शहीद स्मारकाला भेट देऊन पुष्पहार अर्पण केला. तसेच गणेश टेकडी येथे भेट देऊन दर्शन घेतले.