Published On : Sun, Sep 3rd, 2017

जनता दरबारात पालकमंत्री यांनी स्वीकारल्या जनतेच्या तक्रारी

नागपूर : पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविभवन येथे आयोजित जनता दरबारात जनतेच्या तक्रारी स्वीकारल्या. यावेळी दोनशे पन्नास नागरिकांनी आपले गाऱ्हाणी पालकमंत्र्यांसमोर मांडलीत. या तक्रारीची दखल घेवून त्या सोडविण्यात येतील, असे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तक्रारदारांना आश्वासन दिले.

शहरातील तसेच ग्रामीण भागातील नागरिक, विद्यार्थ्यांकडून पालकमंत्री यांच्यासमोर समस्या मांडण्यात आल्या. प्रत्येक निवेदनाची दखल घेवून त्यावर निर्णय घेण्यात येईल, असे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आश्वासन दिले.

आपल्याला प्राप्त निवेदन संबंधितांकडे पाठवून त्यांना त्या संदर्भात निश्चितपणे कार्यवाही करण्यास आपण सांगणार आहोत, असे पालकमंत्री म्हणाले.