कामठी:-भारत सरकारचा युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय भारत सरकारचा अंतर्गत येणारी भारताची सर्वात मोठी युवा संघटना नेहरू युवा केंद्र,नागपूर व ग्रा.पं. गादा, गट ग्रा. पं. गारला- सावळी यांचा संयुक्त विद्यमाने कामठी तालुक्यातील गादा,गारला व सावळी या गावांमध्ये कोरोणा महामारीचा संदर्भात जनजागृती चे स्लोगन लिहिण्यात आले.
नेहरू युवा केंद्राचे राष्ट्रीय युवा कोर प्रथमेश खूरपडी व प्रशांत महल्ले यांचा युवा नेतृत्वात हे जनजागृतीचे स्लोगन सार्वजनिक ठिकाणी लिहिण्यात आले.
आजच्या कोरोणा महामारीच्या संकटा मुळे आपल्या भारता बरोबर संपूर्ण जगातील लोक त्रस्त आहे तरी या संकटात या संकटाला मात देण्याकरिता आपल्या भारता चे संपूर्ण डॉक्टर्स व आरोग्य कर्मचारी ठाम पणे उभे राहून आपल्या जीवाची काळजी न करता या बिमारी च्या जाळ्यात अडकलेल्या रुग्णांवर औषध उपचार करून या बिमारी चा जाळ्यातून त्यांना मुक्त करण्याचं काम हे करत आहे.
त्यांचा या कामगिरी चे कौतुक करण्याकरिता व त्यांचा या कामाचे सन्मान करून त्यांना लोकांनीं सहकार्य करावे या सारखे प्रेरणादायी स्लोगन लिहिण्यात आले, त्याचबरोबर कोरोनाशी लढत असलेल्या रुग्णांना व त्यातून बरे झालेल्या रुग्णांना समाजात त्यांच्याशी कोणतेही भेदभाव न करता त्यांचे आत्मबल वाढवावे अशा प्रकारचे जनजागृतीचे स्लोगन या गावानं मध्ये सार्वजनिक ठिकाणच्या भिंतीवर लिहिण्यात आले.
या कार्याला पाठिंबा देण्याकरिता ग्रा.पं.गादा सरपंच सौ.निर्मलाताई शेंडे व ग्रा.प.सदस्य सचिनजी डांगे, ग्रा.पं गारला- सावळी सरपंच सौ.आरतीताई शहाणे व उपसरपंच राहुलजी बोढारे,अतुल भुजाडे,अक्षय चौधरी,अमर इंगोले,सुनील उक्कुड्डे, अतुल खुरपडी यांनी सहकार्य केले.
संदीप कांबळे कामठी









