कामठी :-. आज ०६ जून २०२० रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज युवा प्रतिष्ठान कामठी तर्फे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग व स्वच्छतेच्या संपूर्ण नियमांचे पालन करीत श्री छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या प्रतिमेचा अभिषेक करण्यात आला व माल्यार्पण करून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला.
वरील प्रसंगी श्री छत्रपती शिवाजी महाराज युवा प्रतिष्ठान कामठी कडून रक्तदान शिवीराचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी जवळपास ४८ मावळ्यांनी रक्तदान करून महाराजांच्या चरणी आपली मानवंदना वाहिली.
वरील कार्यक्रमास हितेश बावनकुळे, पंकज नालेंद्रवार, चंद्रशेखर तूप्पट, अनिल देशमुख, नंदिनीताई चौधरी, श्रीकांत मुरमारे, किर्तीताई मुरमारे, रोहित तरारे, शुभम नागपुरे, आयुष शेंडे, दिपचंदजी सुपारे, रमेशजी राऊत, गणेश सायरे, आकाश बरडे, दुर्गेश थोटे, ओशिन प्रजापती, सुमित शर्मा, अक्षय ढोक, इत्यादी उपस्थित होते.
हे रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी रिषभ मोहोड, अनिकेत तरारे व हर्षल पोटभरे ह्यांच्या विशेष योगदान लाभले.
संदीप कांबळे कामठी