एक तास अनावश्यक वीज दिवे बंद करून नागरिकांचे सहकार्य
नागपूर : नागपूर महानगरपालिका आणि ग्रीन व्हिजील फाउंडेशनच्या सहकार्याने मंगळवारी (ता.१३) लक्ष्मीनगर झोन अंतर्गत अभ्यंकर नगर चौक व्हीएनआयटी प्रवेशद्वारापुढील परिसरात पौर्णिमा दिवसाच्या निमित्ताने जनजागृती करण्यात आली.
जनजागृती उपक्रमादरम्यान ग्रीन व्हिजील फाउंडेशनच्या स्वयंसेवकांनी परिसरातील व्यापारी बांधवाना, आस्थापनांना भेट देउन तिथे वीज बचतीचे महत्व सांगितले व नागरिकांना किमान १ तास अनावश्यक विद्युत दिवे बंद करण्याचे आवाहन केले. परिसरातील व्यापारी बांधवांनीही मनपा व ग्रीन व्हिजील फाउंडेशनच्या या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत विद्युत दिवे बंद करून उपक्रमात आपले योगदान दर्शविले.
ग्रीन व्हिजिल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष कौस्तभ चॅटर्जी यांच्या नेतृत्वात टीम लीडर सुरभी जैस्वाल, मेहुल कोसुरकर, शीतल चौधरी,बिष्णुदेव यादव, श्रीया जोगे, प्रिया यादव, पारस जांगडे, सुजय काळबांडे, तुषार देशमुख, दीपक प्रसाद,धनश्री आग्रे, साक्षी मुळेकर आदींनी परिसरात जनजागृती करीत व्यापारी व नागरिकांना त्यांच्या प्रतिष्ठान व घरातील वीज दिवे एक तासांकरिता बंद करण्याची विनंती केली. या मोहिमेत मनपाचे कनिष्ठ अभियंता राजेंद्र राठोड, विप्लब भगत, गजेंद्र तारापुरे, सचिन फाटे यांच्यासह भोलानाथ सहारे, विजयकुमार अग्रवाल, भाग्यश्री चन्ने आदींनीही सहभाग नोंदविला.
धर्मेंद्र प्रधान के इस्तीफे से लड़ाई नहीं रुकेगी #StudentProtest #Congress #Trending #NEETScam...
Instagram पर Part Time Job के नाम पर ₹6.84 लाख की ठगी...
₹150 के लालच में चाकू से हमला! #NagpurCrime #Crime #ERickshaw #PoliceAction #CCTV...
पार्किंग विवाद ने लिया हिंसक रूप! #NagpurNews #Crime #ParkingDispute #VikasThakre #PoliceAction
रॉन्ग साइड से आई मौत! #Accident #HighwayAccident #NagpurNews #MaharashtraNews #TruckAccident #news
RSS मुख्यालय को लेकर X पर भ्रामक पोस्ट करने का आरोप #vidarbhanews...







