Published On : Sat, Mar 31st, 2018

युवक कॉंग्रेस चे बेरोजगार युवकांच्या मोर्चासाठी पथनाट्याद्वारे जनजागृती अभियान


नागपूर: नागपूर लोकसभा युवक कॉंग्रेस ने दि 1/4/2018 ला सकाळी 11 वाजता होणाऱ्या एल्गार मोर्चासाठी पथनाट्याच्या माध्यमातून बेरोजगार युवकांना जागरुक करण्यासाठी त्रीशरन चौक रामेश्वरी येथे अखिल भारतीय युवक कॉंग्रेस चे राष्ट्रीय सचिव, नागपूर लोकसभा युवक कॉंग्रेस अध्यक्ष बंटी बाबा शेळके यांच्या नेत्रुत्वात करण्यात आले या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे श्री गिरीश पांडव , नगरसेवक मनोज गावंडे व शिवछत्रपती प्रतिष्ठान चे अध्यक्ष रितेश पांडे उपस्थित होते.

बंटी शेळके युवकांना मार्गदर्शन करतांना म्हणाले की सत्तेवर येण्यापूर्वी प्रधानमंत्री दरवर्षी 2 करोड युवकांना रोजगार देऊ असे खोटे आश्वासन देऊन युवकांची फसवणूक केली रोजगार सोडा पण असलेल्या नोकऱ्या नोटबंदी मुळे युवकांना सोडाव्या लागले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सुद्धा मिहान मध्ये दरवर्षी 2 लाख बेरोजगार युवकांना नोकऱ्या देऊ अशी खोटी स्वप्न दाखवून युवकांची दिशाभूल केली.

आता यांना आठवण करुण देण्यासाठी 1 एप्रिल 2018 रोजी सकाळी 10 वाजता नागपूर विद्यापीठ ते यशवंत स्टेडियम पर्यंत एल्गार मोर्चा काढण्यात येईल. या करिता आतापर्यंत युवक कॉंग्रेस ने मध्य नागपुरात 98 पथनाट्य तसेच सम्पूर्ण नागपूर शहरात 178 पथनाट्य करून युवकांना जागरूक करण्याचे काम केले आहे.पथनाट्यात परिसरातील असंख्य युवा वर्ग व नागरिक उत्सुकपणे उपस्थित होते.पथनाट्याचे आयोजन युवक कॉंग्रेस चे अक्षय हेटे, रसिक राणेकर , अक्षय घाटोळे , सोहेल खान , शिवा अर्खेल, बाबू खान , राजेंद्र ठाकरे सौरभ शेळके , सागर चव्हाण , हेमंत कातूरे , जावेद शेख , आशिष लोणारकर , पुजक मदने, फजलूर कुरेशी , स्वप्नील ढोके , नावेद शेख यांनी केले.