Published On : Wed, May 16th, 2018

पाकिस्तान/बांग्लादेशातून भारतात आलेल्या हिंदू अल्पसंख्याक नागरिकांना भारताचे नागरिकत्व प्रदान – डॉ. रणजित पाटील

Advertisement

Ranjit Patil

मुंबई: पाकिस्तान व बांग्लादेशातून भारतात आलेल्या आठ हिंदू अल्पसंख्याक नागरिकांना आज गृह राज्यमंत्री (शहरे) यांच्या हस्ते भारतीय नागरिकत्वाचे प्रमाणपत्र देण्यात आले.

पूर्वीपासून पाकिस्तानात राहिलेले व आता भारतात वास्तव्यास असलेल्या हिंदू अल्पसंख्याक नागरिकांना भारताचे नागरिकत्व देण्याचा केंद्र शासनाने निर्णय घेतला होता. सन 2016 मध्ये घेतलेल्या निर्णयानुसार अशा लोकांना भारताच्या नागरिकत्वाचे प्रमाणपत्र देण्याचे अधिकार राज्यांना देण्यात आले होते. या निर्णयानुसार जळगाव, कोल्हापूर, औरंगाबाद या जिल्ह्यात वास्तव्यास असलेल्या या नागरिकांना आज मंत्रालयात झालेल्या कार्यक्रमात भारतीय नागरिकत्व प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. यावेळी माजी आमदार हसमुख जगवानी उपस्थित होते.

डॉ. पाटील म्हणाले, गेल्या अनेक वर्षापासून पाकिस्तानातील राहिलेल्या व आता भारतात वास्तव्यास असलेल्या हिंदू अल्पसंख्याक नागरिकांना भारताचे नागरिकत्व देण्याची मागणी होत होती. ही मागणी या निमित्ताने पूर्ण होत असल्याचा आनंद आहे.