Published On : Fri, May 7th, 2021

हडसच्या माजी विद्यार्थ्यांकडून मनपाला दोन ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर प्रदान

१९८५ बॅचच्या विद्यार्थ्यांचा सामाजिक दायित्वातून पुढाकार

नागपूर, : कोरोनाच्या या संकटामध्ये अनेक रुग्णांचे ऑक्सिजन, औषधांविना मोठे हाल होत आहेत. प्रत्येक रुग्णाला वेळेवर योग्य उपचार मिळावे, ऑक्सिजन अभावी कुणालाही जीव गमवावा लागू नये, या हेतूने हडस हायस्कूलच्या १९८५ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी नागपूर महानगरपालिकेला दोन ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर प्रदान केले.

Gold Rate
18 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,09,900 /-
Gold 22 KT ₹ 1,02,200 /-
Silver/Kg ₹ 1,26,500/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

हडसचे माजी विद्यार्थी नरसिंह शर्मा, देवेन्द्र मत्ते, सचिन पाठक, शशांक ढेपे, पराग वानखेडे यांनी १९८५ बॅचमधील सर्व १८० विद्यार्थ्यांच्यावतीने दोन्ही ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्याकडे सुपूर्द केले. यावेळी अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा उपस्थित होते.

कोरोनाच्या उपचारामध्ये ऑक्सिजन अत्यंत गरजेचे आहे. ऑक्सिजनच्या तुटवड्या अभावी काही दिवसांपूर्वी शहरात निर्माण झालेल्या परिस्थितीने भीषणतेची जाणीव करून दिली. या परिस्थितीमध्ये प्रशासनाद्वारे आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्यात येत आहेत. या कार्यामध्ये समाजातील व्यक्तींकडून येणारे मदतीचे हात प्रशासनाला अधिक प्रेरणा देतात, अशा शब्दांमध्ये मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी सर्व दानदात्याचे आभार मानले.

सामाजिक भावनेतून हडसचे माजी विद्यार्थी या भूमिकेतून १९८५च्या बॅचमधील सर्व १८० विद्यार्थ्यांद्वारे एकमताने या संकटाच्या परिस्थितीमध्ये मदत करण्याची संकल्पना पुढे आली. आपल्या शहरामध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांना आपल्या पुढाकारातून काही फायदा होउ शकेल याचा आनंद आहे, अशी भावना यावेळी हडसच्या माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

Advertisement
Advertisement