वेकोलिकडून मनपाला मास्क व सॅनिटायजर प्रदान
नागपूर : ‘सतर्क भारत-समृध्द भारत’ या संकल्पनेसह ‘दक्षता जनजागृती सप्ताह’ निमित्त वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड (वेकोलि)तर्फे नागपूर महानगरपालिकेला सॅनिटायजर व मास्क प्रदान करण्यात आले.
वेकोलि तर्फे २७ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर या कालावधीमध्ये ‘दक्षता जनजागृती सप्ताह’ साजरा केला जात आहे. त्याचे औचित्य साधून मंगळवारी (ता.२७) नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य सेवकांकरिता मास्क आणि हँड सॅनिटायजर देण्यात आले.
वेकोलिचे महाप्रबंधक (सतर्कता) संजीव शेंडे यांनी मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांच्याकडे मास्क व सॅनिटाजर सुपूर्द केले. याप्रसंगी सलाहकार (जनसंपर्क) एस.पी.सिंह, उपप्रबंधक (सतर्कता) राहुल नवानी आणि सहाय्यक प्रबंधक (राजभाषा/जनसंपर्क) डॉ.मनोज कुमार उपस्थित होते.