Published On : Fri, Oct 16th, 2020

भंडारा जिल्ह्यातील वाढीव पाणीपुरवठा योजनांसाठी तांत्रिक आणि प्रशासकीय मान्यता तातडीने द्या

Advertisement

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले

भंडारा : महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत लाखांदूर, लाखनी, साकोली आणि मोहाडी (जिल्हा भंडारा) नगरपालिका आणि पंचायतीकरिता वाढीव पाणीपुरवठा योजनेअंतर्गत तांत्रिक व प्रशासकीय मान्यता देण्याची कारवाई तातडीने करावी असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले. याठिकाणी पिण्याच्या पाण्याची अत्यंत निकड असून सर्व आवश्यक त्या परवानग्या व तांत्रिक बाबींची पूर्तत: तातडीने करण्यात येवून लवकरात लवकर काम सुरू व्हावे आणि येथील नागरिकांना दिलासा मिळावा अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या.

Advertisement
Advertisement

विधानभवन येथे भंडारा जिल्ह्यात नगरपालिका आणि पंचायतीकरिता वाढीव पाणीपुरवठा योजनेसंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले हे बोलत होते. या बैठकीस नगरविकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, प्रधान सचिव महेश पाठक, सहसचिव पांडूरंग जाधव, उपसचिव डॉ. माधव वीर, जलसंपदाचे अवर सचिव वैशाली कुरणे आदीसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

पिण्याचे पाणी ही जीवनावश्यक गरज आहे. लाखांदूर प्रादेशिक पाणी पुरवठा योजना ही ग्रामीण निकषानुसार असल्याने आणि लोकसंख्या वाढल्याने या विभागातील पाण्याचा तुटवडा भासत आहे. याचबरोबर लाखनी येथीलही पाणीपुरवठा योजना बंद असल्याने पाण्याचा प्रश्न उद्भवला आहे. याचबरोबर साकोली आणि सेंदूरवाफा गावची लोकसंख्या ही 24890 इतकी असून येथेही पाण्याची समस्या भेडसावत आहे. सदर योजनेसाठी लागणारी पुरवठा विहीर व अॅप्रोच ब्रिज, पाण्याची टाकी, जलशुद्धीकरण केंद्र यासाठीच्या तांत्रिक तसेच प्रशासकीय मान्यता देण्यासंदर्भात कार्यवाहीस वेग द्यावा असे निर्देश अध्यक्ष नाना पटोले यांनी संबंधितांना दिले.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement