Published On : Fri, Aug 5th, 2022
By Nagpur Today Nagpur News

केंद्र शासनाच्या हुकूमशाही विरोधात कांग्रेसचे तहसील कार्यालयासमोर नारे निदर्शने

Advertisement

कामठी:-केंद्रातील भाजप सरकार विविध पातळ्यांवर अपयशी ठरत आहे.दुसरीकडे ईडीच्या माध्यमातून सूडबुद्धीने कार्यवाही करीत आहे.या बाबींच्या निषेधार्थ केंद्र शासनाच्या हुकुमशाही हिटलरशाही विरोधात कांग्रेसच्या वतीने आज 5 ऑगस्ट ला कामठी तहसील कार्यालय समोर दुपारी 12 वाजता नारे निदर्शने करीत तहसीलदार अक्षय पोयाम यांना सामूहिक निवेदन सादर करण्यात आले.

याप्रसंगी या आंदोलनाचे नेतृत्व करणारे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेशभाऊ भोयर यांनी सांगितले की देशात वाढत असलेली महागाईमुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीस आली आहे.अग्निपथ योजना बेकायदेशीर लादली,पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस, जीवनावश्यक वस्तूवर जीएसटी लावून सर्वसामान्य जनतेचे जगणे कठीण केले आहे. या विरोधात आवाज उठविणाऱ्या विरोधात ईडीच्या माध्यमातून सूडबुद्धीने कारवाही करण्यात येत आहे.सध्याच्या राज्य सरकारने महिनाभरात 772 निर्णय घेतले मात्र शेतकऱ्यांना एकही निर्णयाचा फायदा झालेला नाही.बेरोजगारी वाढली असून बेरोजगारीचे प्रमाण 8 टक्के पेक्षा जास्त गेले आहे.

Gold Rate
06 May 2025
Gold 24 KT 97,000/-
Gold 22 KT 90,200/-
Silver/Kg 96,900/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

याला जवाबदार केंद्र सरकार असून त्यांनी रोजगार देणारे सर्व उपक्रम विकल्यामुळे अशी स्थिती निर्माण झाली आहे.2 कोटी लोकांना रोजगार देण्याचा दावा फोल ठरला आहे.मनरेगा अंतर्गत फक्त कांग्रेसने रोजगार दिले होते असेही ते म्हणाले.दिल्ली येथील कांग्रेस कार्यालयासमोर सुरक्षा वाढवून मुस्कटदाबी करण्यात येत असल्याचा आरोप करीत यावेळी कांग्रेस च्या वतीने केंद्र शासनाचा निषेध करीत माजी जी प अध्यक्ष सुरेशभाऊ भोयर यांच्या नेतृत्वात आदी कांग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या मुख्य उपस्थितीत तहसीलदार अक्षय पोयाम यांना सामूहिक निवेदन सादर करण्यात आले.

याप्रसंगी माजी नगराध्यक्ष शकुर नागाणी, कांग्रेस शहराध्यक्ष कृष्णा यादव,कांग्रेस शहर कार्याध्यक्ष मो आबीद ताजी, जी प सदस्य नाना कंभाले, जी प सदस्य दिनेश ढोले, माजी जी प सदस्य तक्षशिलाताई वाघधरे,माजी नगरसेविका ममता कांबळे, अनुराग भोयर, मो ईरशाद शेख,कामठी पंचायत समितीचे उपसभापती आशिष मललेवार, माजी नगराध्यक्ष गुड्डू मांनवटकर,कामठी पंचायत समिती सदस्य सुमेध रंगारी, निखिल फलके,घनश्याम फलके, अर्जुन राऊत,माजी नगरसेवक मो आरिफ, माजी नगरसेवक मो उबेद सईद अफरोज, फारूक कुरेशी, आशिष मेश्राम, प्रमोद गेडाम, खैरी ग्रा प चे माजी सरपंच किशोर धांडे,आसलवाडा ग्रा प चे अर्जुन राऊत, केम ग्रा पं चे उपसरपंच अतुल बाळबुधे,राजकुमार गेडाम, मो सुलतान, माजी ग्रा प सदस्य अनिल पाटील, निर्मल वानखेडे,मो राशीद अन्सारी,मोहम्मद सलमान खान,करार हैदरी,इरफान अहमद,अर्षद खान,अफसर खान,दिवाकर सौदागर, कुसुमताई खोब्रागडे यासह कांग्रेस पदाधिकारी, कार्यकर्तेगण मोठ्या संख्येत आदी उपस्थित होते.

Advertisement
Advertisement