Published On : Fri, Nov 8th, 2019

दिल्लीतील घटनेच्या निषेधार्थ कामठी वकील संघातर्फे लाल फिती लावून दर्शीविला निषेध

कामठी :-दिल्ली येथील तीस हजारी न्यायालय आवारात 2 नोव्हेंबर रोजी दिल्ली पोलिसांच्या वतीने वकीलावर केलेल्या अमानुष हल्ल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र आणि गोवा बार काऊन्सिल यांच्या सूचनेनुसार कामठी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात कामठी वकील संघाच्या वतीने लाल फिती लावून निषेध व्यक्त करण्यात आला तसेच कामठी वकील संघाच्या वतीने विधिस्त संरक्षण कायदा तयार करण्याची मागणी सर्वानुमते करण्यात आली.

याप्रसंगी कामठी वकील संघाचे अध्यक्ष ऍड मनिविकास शर्मा, ऍड प्रदीप काणुंगो ऍड प्रदीप गजवे,ऍड विलास जागडे, ऍड प्रफुल पुडके, ऍड परीक्षित हरदास,ऍड श्रीकांत मानकर,ऍड डी जी रामटेके,ऍड पंकज यादव, ऍड ऍड फालेकर, ऍड बागडे,ऍड कुशवाहा,ऍड तिजारे, ऍड सुनील भरडे, ऍड मयूर बोरकर, ऍड नितेश वासनिक, ऍड अविनाश भीमटे, ऍड राजविलास भीमटे, ऍड रिना गणवीर, ऍड संदीप अढाऊ, ऍड काळे, ऍड परीक्षित यादव, ऍड हुसैन, ऍड नरवाडे आदी वकील वर्ग प्रामुख्याने उपस्थित होते.

संदीप कांबळे कामठी