Published On : Fri, Nov 8th, 2019

विकासकामांचा प्राधान्यक्रम निश्चित करण्याची गरज:-बीडीओ सचीन सूर्यवंशी

कामठी:-केंद्र सरकारच्याया धोरणात्मक निर्णयामुळे विकासकामांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना मोठ्या प्रमाणावर थेट निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे .या निधीचा सुयोग्य वापर व्हावा यासाठी ग्रामपंचायतींनी विकासकामाचा प्राधान्यक्रम निश्चित करण्याची गरज असल्याचे मौलिक प्रतिपादन कामठी पंचायत समिती चे गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी यांनी केले आहे.

आमचं गाव आमचा विकास’ या उपक्रमा अंतर्गत ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करणे संदर्भात तालुक्यातील सरपंच आणि सचिवांचे दोन दिवसीय संयुक्त प्रशिक्षणाच्या उदघाटन प्रसंगीं ते बोलत होते ग्रामपंचायतींना प्राप्त होणाऱ्या निधींपैकी किमान पंचवीस टक्के निधी शिक्षण, आरोग्य आणि उपयोगिया यावर खर्च करणे अनिवार्य आहे .दरम्यान कामठी तालुक्यातील कढोली ग्रा प ला पंचायत राज सशक्तीकरण पुरस्कार मिळाल्याबद्दल सरपंच प्रांजल वाघ व सचिव ब्रह्मानंद खडसे यांचा कामठी पंचायत समिती तसेच तालुका सरपंच संघटनेच्या वतीने शाल श्रीफळ देऊन अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला.

याप्रसंगी ‘आमचं गाव आमचं विकास ‘उपक्रमाचे प्रशिक्षक नानाजी कुंदावार, विजय गोमेकर, विस्तार अधिकारी शशिकांत डाखोळे, अरविंद अंतुरकर, तसेच येरखेडा ग्रा प सरपंच मंगला कारेमोरे, खैरी ग्रा प सरपंच मोरेश्वर उर्फ बंडू कापसे, आदी सरपंच सचिव वर्ग मोठ्या संख्येत उपस्थित होते. या दोन दिवसीय प्रशिक्षणाचा आज समारोप झाला असून कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पृथ्वीराज डोंगरे यांनी केले तर आभार अरविंद अंतुरकर यांनी मानले.

संदीप कांबळे कामठी