Published On : Sun, Apr 28th, 2024
By Nagpur Today Nagpur News

नागपुरातील जरीपटका येथे स्पा सेंटरच्या आड देहव्यापार;महिलेसह तिघांना अटक

तीन पिडीत महिलांची सुटका

नागपूर :गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा भांडाफोड केला आहे.

जरीपटक्याच्या रिलॅक्स स्पा द हेअर अँड ब्युटी नावाच्या सेंटरमध्ये ही करवाई करण्यात आली. यात एका महिलेसह तिघांना पोलीसांनी अटक केली तर इतर तीन महिलांची सुटका करण्यात आली आहे.यातील दोन आरोपी अद्यापही फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

Gold Rate
12 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,10,100 /-
Gold 22 KT ₹ 1,02,400 /-
Silver/Kg ₹ 1,28,300/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

ही कारवाई गुन्हे शाखेच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाने केली.

रक्षा उर्फ सना मनिष शुक्ला (२२, रा. रविनगर), मोहम्मद नासीर अब्दुल शकुर भाटी (४८) आणि फिरोज अब्दुल शकुर भाटी दोघे. रा. लक्ष्मी प्लाझा गॅलेक्सी अर्बन, मानकापूर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. हे तिघेही आपल्या आर्थिक फायद्यासाठी पिडीत महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांना देहव्यवसाय करण्यास भाग पाडले.

गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला या बाबत माहिती मिळताच त्यांनी शुक्रवारी २६ एप्रिलला दुपारी ४.५० ते रात्री ८.५० दरम्यान जरीपटका येथील जिंजर मॉलमधील रिलॅक्स स्पा द हेअर अँड ब्युटीवर धाड टाकली.

तेथे तिन्ही आरोपी पिडीत तीन महिलांकडून देहव्यापार करवून घेताना आढळले. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून तीन पिडीत महिलांची सुटका केली. यादरम्यान करण्यात आलेल्या चौकशीत आरोपींच्या ताब्यातून आयफोन व रोख ५ हजार असा एकुण ८५ हजार ११० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Advertisement
Advertisement